देख ले भगवान दक्षिण की हालत… कितना बदल गये आमदार ! निधीसाठी नगरसेवकांचा टाहो….तर नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा! ….

– विकासकामांची दवंडी पिटवणाऱ्यांनी पहावी दक्षिणची बुरी से बत्तर हालत !

 – जुळे सोलापूरमधील अनेक प्रभागाची दुरावस्था कायम !

– निधीसाठी नगरसेवकांचा टाहो तर नागरिकांनी वाचला विविध समस्यांचा पाढा..

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २७ सप्टेंबर – सोलापूर शहराचा कायापालट झाला, दक्षिण मतदार संघामध्ये विकास कामे झाली , विशेषतः जुळे सोलापूर परिसरामध्ये मूलभूत सोयी सुविधा निर्माण झाल्या, अशा विविध प्रकारची विकास कामे झाल्याची दवंडी पिटवणाऱ्या समर्थकांनी जुळे सोलापूर परिसरातील विविध प्रभागांची पाहणी करावी आणि वस्तुस्थिती पहावी असा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जुळे सोलापूर परिसरात राहणाऱ्या हद्दवाढ भागातील नागरिकांना आपल्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. महापालिकेचे कर भरून देखील पाणी वीज दिवाबत्ती ड्रेनेज अशा विविध मूलभूत सुविधा अद्यापही शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचल्या नसल्याचे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे.

      जुळे सोलापूरमधील कोरे वस्ती, राऊत वस्ती, ए जी पाटील नगर, रोहिणी नगर भाग एक, रत्न मंजिरी नगर, गुरुदेव दत्त नगर एक ते सहा, रेणुका नगर, प्रल्हाद नगर, प्रियंका नगर, एस आर पी कॅम्प परिसर, बँक कॉलनी, सुभाष शहा नगर, बंडापा नगर, पाटलीपुत्र नगर, अमर नगर, राघवेंद्र नगर, राम नारायण चंडक विहार,असे अनेक नगर विकासापासून वंचित आहेत.

तेथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून नरकयातना भोगत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी यांचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.  या मतदारसंघात आमदार तर कधी फिरकलेच नाहीत. एखादे खेडेगाव बरे पण ह्या जुळे सोलापुरात नको अशा नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत.

    

  दरम्यान स्थानिक नगरसेवकांनी सुचवलेली कामे वरिष्ठ स्तरावर केली जात नाहीत. प्रत्येक कामामध्ये टक्केवारी मागितली जाते. त्यामुळे नगरसेवकांना विधानसभेचा निधी मुबलक प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे प्रभागाचा आणि नगराचा विकास म्हणावा तसा होत नाही. सलग पाच वर्षापासून निवेदने दिलेले असूनही जाणून बुजून हेतू पुरस्कार  नगरसेवकांना डावलल्याने त्या भागातील विद्यमान नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

जुळे सोलापूरचा पर्यायाने दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास होणे आवश्यक..

सर्वसामान्य जनताच म्हणत आहे की यावेळेस नवीन चेहरा पाहिजे, तो ही सर्वधर्म समभाव बाळगणारा, प्रशासकीय कामांमध्ये प्राविण्य प्राप्त व्यक्ती, कुठलाही गट-तट न करणारा, सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येणारा, दुजाभाव न बाळगणारा,सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारा,असाच नवीन चेहरा दक्षिण मतदार संघात पाहिजे, जेणेकरून खेड्यासारखी अवस्था बनलेल्या जुळे सोलापूरचा पर्यायाने दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास होईल.

– व्यथीत माजी नगरसेविका, सोलापूर महानगरपालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *