जिजूस ख्राईस्ट गोस्पल सोसायटी चर्चचा स्त्युत्य उपक्रम…

मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न…

जिजूस ख्राईस्ट गोस्पल सोसायटी चर्चचा स्तुत्य उपक्रम…

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि १३ ऑगस्ट – जिजूस ख्राईस्ट गॉस्पल सोसायटी चर्च वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सप्ताह अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे शिबीर संपन्न झाले. सदर शिबीरामध्ये २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

दरम्यान यामध्ये ३१ रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले. त्यापैकी १० रूग्णांचे दि.१० ऑगस्ट रोजी ऑपरेशन जिज्स खाईस्ट गॉस्पल सोसायटी चर्च वतीने करण्यात आले. व २० रूग्णांचे ऑपरेशन १४ ऑगस्ट रोजी करण्यात येत आहे. या शिबीरामध्ये ४० रुग्णांना नंबरचे चष्मे लागले.

सदर शिबीरामध्ये लायन्स क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल संचलित, डॉ. शिवाजी पाटील (आर.एम.ओ.), यांनी रूगणाची तपासणी व ऑपरेशन यशस्वी केले. सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक तंबोळू, सागर तंबोळू, सुरेश भंडारे, पेरेश कुनसिकर, राजू मोटपेरूलू, लाजर सातलोलू, योहान तंबोळू, सुरेश म्हेत्रे, विलसन आसरेड्डी व चर्चचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *