Jawan | शाहरूखने ‘Solapur Wow’ म्हणत Share केला सोलापूरकरांचा व्हिडीओ

Jawan
Jawan

 

Jawan | नुकताच शाहरूख खान चा Jawan सिनेमा रिलीज झाला आहे. दरम्यान सोलापूकरांनी सिनेमा बघताना शाहरूखच्या “झिंदा बंदा हो…” या गाण्यावर सोलापूरातील तरूणाई बेभान होऊन थिएटर मध्ये थिरकली आहे. हा थिरकतानाचा व्हिडीओ शाहरूखच्या हाती लागताच त्याने तो व्हिडीओ त्याच्या एक्स (व्टिटर) अकांऊटवर Share करत “Solapur Wow‌! You boys and girls are so wonderful. Love to u all. A be happy and healthy.” असा संदेश सोलापूरकरांसाठी लिहत त्याने सोलापूरकरांचे आभार मानले आणि त्यांना नेहमी आनंदी आणि निरोगी राहण्यास सांगितले. 

सोलापुरात शाहरूखचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. यापूर्वी शाहरूखचा “पठाण” सिनेमा पाहण्यासाठी एका चाहत्याने संपूर्ण थिएटर बुक केले होते. तर सध्याच्या Jawan साठीही Shah Rukh Khan Universe Fan Club ने पहिल्याच दिवशी संपूर्ण थिएटर बुक केले होते. तर काही चाहत्यांनी Jawan पाहण्यासाठी दानधर्म करण्याचा उपक्रम हाती घेतला.

नागराज मंजुळेंनी केला होता व्हिडीओ शेअर

सोलापूरचा प्रेक्षक “सैराट”च्या “झिंग झिंग झिंगाट” गाण्यावर जल्लोषात थिरकतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला होता. पुढे तोच व्हिडीओ नागराज मंजुळे यांच्यापर्यंत पोहचला. मंजुळे यांनी त्यावेळी सोलापूरकर रसिकांचे आभार मानत तो व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता. त्यानंतर आता शाहरख ने देखील सोलापूरकरांचे आभार मानत व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची चर्चा सोलापूर बरोबरच देशभरात सुरू आहे. Jawan

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :

 

Jawan
Jawan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *