Jawan | ‘जवान’ने रचला इतिहास! पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

 

Jawan

‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत होता. आता Jawan ने पहिल्या दिवशी कोट्यावधी रूपये कमावले आहेत. बॉलीवूड स्टार शाहरुख खान ने ‘पठाण’च्या  यशानंतर ‘Jawan ‘ हा चित्रपट घेऊन आला आहे. ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता शाहरुखचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि त्याने प्रदर्शित होण्यापूर्वीच रेकॉर्ड तोडले आहेत. पहिल्या दिवशी किती कमाई झाली हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

Jawan

पहिल्याच दिवशी 75 कोटींची कमाई

‘Jawan’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 75 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला, ज्यात हिंदी ने 65 कोटी, तमिळ ने 5 कोटी आणि तेलुगू ने 5 कोटींची कमाई केली आहे. शाहरुख खान अभिनीत ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 57 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 70.50 कोटींची कमाई केली होती. पाचव्या दिवशी 60.75 कोटींची कमाई केली. ‘जवान’ ‘पठाण’ पेक्षाही जास्त कमाई करेल, अशी चित्रपट समिक्षकांचीअपेक्षा आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, आगाऊ बुकिंगमध्ये 7 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली होती, ज्याने सुमारे 21.14 कोटी कमावले होते. शाहरुख खानसोबत नयनतारा, सान्या मल्होत्रा ​​आणि रिद्धी डोगरा या अभिनेत्रीही ‘Jawan’ चित्रपटात आहेत. तर दीपिका पदुकोण आणि विजय सेतुपतीही यांनीही चित्रपटात हजेरी लावली आहे.

Jawan

हे ही वाचा

Jawan | “जवान”मधील कोणत्या कलाकाराने किती घेतले मानधन ?

Jawan Trailer | ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *