कोल्हापुरातील कापा फणस थेट सोलापूरात दाखल.. शेतकरी ते ग्राहक संकल्पनेतून शहरवासीयांनी घेतला अस्सल स्वादिष्ट कापा फणसाचा आस्वाद…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक 16 जून 2024
कोकणातील हापूस आंब्यासह फणस प्रसिद्ध असून फणसाचे गरे शहरातील विविध ठिकाणी हातगाड्यांवर विकली जातात परंतु आज कोल्हापुरातील कापा फणस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट सोलापूर गाठले आहे. शहरातील सात रस्ता परिसरात पिकअप वाहनात अख्खे फणस विक्रीसाठी आणले असून शहरवासीयांना फणस पाहून अप्रूप वाटत आहे.
हातगाड्यांवर केवळ फणस गरे पहावयास मिळतात परंतु या ठिकाणी अख्खे फणस तेही पिकअपप वाहन भरून आणलेले होते. यावेळी ग्राहकांनी फणस घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. सुमारे शंभर रुपयापासून ते पाचशे रुपये पर्यंतचे अख्खे फणस विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. झाडांवरच तयार झालेले फणस यावेळी ग्राहकांना आकर्षित करणारे ठरले. कोकणातील हे फळ सोलापूर शहरवासीयांना हवेहवेसे वाटले. कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी आंब्यानंतर आता फणस विक्री करण्यासाठी सोलापूर हे चांगले ठिकाण शोधून काढले आहे. थेट शेतकरी ते ग्राहक असा शेतमाल विक्री करण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवला. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या हंगामात अशाच पद्धतीने थेट कोल्हापुरातील शेतकरी आंबा विक्रीसाठी व्हीआयपी रोडवर व्यवसाय करीत होते. आता सात रस्ता परिसरात फणस विक्री करण्यासाठी शेतकरी दाखल झाले आहेत. लहान मोठ्या आकारातील तसेच कच्चे आणि पिकलेले फणस वेगवेगळ्या किमतीला विकण्यास ठेवण्यात आले होते. यावेळी महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि हातगाडीवर व्यवसाय करणारे युवकांनी देखील फणस विकत घेतले. अत्यंत ताजे आणि पिकलेले फणस सोलापूरकरांनी पहिल्यांदाच पाहिले असावे असा घेराव शेतकऱ्यांच्या पिकअप वाणा भोवती घातला होता. छोट्या आकारातील फणस १०० रुपये मध्यम आकारातील फणस ३०० रुपये मोठ्या आकारातील पिकलेले फणस ५०० रुपये असा दरात विक्री केली. दरम्यान पावसाळ्यामध्ये फणस फळ पिकण्यास सुरुवात होते. याच दरम्यान जांभूळ आणि फणस मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीला येतात. कोकण कोल्हापूर आदी भागात हे फळ सर्रासपणे पाहिले जातात परंतु सोलापुरात असे फळ फक्त हंगामात येतात त्यामुळे त्यांचे दर प्रति किलो मागे १०० रुपये पर्यंत ते १५० रुपये पर्यंत असतात अशावेळी शेतकरी ते थेट ग्राहक संकल्पना उपयोगात आणून शेतकरी कमी दरामध्ये आपला शेतमाल ग्राहकांपर्यंत विक्रीसाठी आणत आहेत असे मत शेतकरी संभाजी कदम यांनी व्यक्त केले आहे. आपल्या शेतातील आणि डोंगर दऱ्यातील फणस काळी मैना काजू आंबा अशी फळे थेट ग्राहकांपर्यंत कमी दरात पोहोचावीत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत जेणेकरून ग्राहकांना देखील अस्सल गावरान कोणतीही भेळ मिसळ न केलेले फळ खाण्यासाठी मिळावे असेही यावेळी त्यांनी सांगितले..
फणसाच्या बिया विविध आजारांवर उपयोगी…
फणस पृष्ठभागावरून जरी काटेरी असले तरी आतून गरे मऊ आणि चवदार असतात तशाच पद्धतीने त्याचे बिया देखील गुणकारी असतात. आयुर्वेदिक औषधे बनवण्यात याचा वापर केला जातो. मधुमेह आणि रक्तदाब या आजारांवर हे बिया उपायकारक असल्याचे सांगण्यात आले.