सोलापूर रेल्वे विभागात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल..!
काही रेल्वेगाड्याच्या फेऱ्या अंशतः तर काहींच्या पूर्ण रद्द..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. २५ सप्टेंबर – सोलापूर तसेच कर्नाटक मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच अंतर्गत हुबळी रेल्वे विभाग क्षेत्रातील लच्याण ते तडवळ रेल्वे स्थानकांच्या दरम्यान झालेल्या रेल्वेरूळ बिघाडानंतर रेल्वेरुळ दुरुस्तीचे कामकाज हुबळी रेल्वे विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सदरचे रेल्वेरुळ दुरुस्तीसाठी सोलापूर रेल्वे विभागात धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये दि.२५ ,२६ आणि २७ सप्टेंबर रोजी बदल करण्यात आला आहे.
– वेळापत्रकामध्ये बदल झालेल्या रेल्वेगाड्यांचा तपशील खालिलप्रमाणे –
# छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-होसपेट एक्सप्रेस हि गाडी सोलापूर ते होसपेट दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
# होसपेट-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस हि गाडी सोलापूर ते होसपेट दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
# म्हैसूर-बागलकोट एक्सप्रेस हि गाडी सोलापूर-बागलकोट दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
# बागलकोट-मैसूर एक्सप्रेस हि गाडी सोलापूर-बागलकोट दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
# मैसूर-पंढरपूर एक्सप्रेस हि गाडी विजापूर-पंढरपूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
# पंढरपूर-मैसूर हि गाडी विजयपूर-पंढरपूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
# साईनगर शिर्डी- मैसूर या गाडीचा मार्ग परिवर्तन करून होटगी – वाडी – गुंटकल – बेल्लारी मार्गे धावणार आहे.
# सोलापूर- होसपेट हि गाडी दि.२६ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
# होसपेट-सोलापूर हि गाडी दि.२७ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांनी रेल्वे गाड्यांच्या तपशिलात झालेला बदल लक्षात घ्यावा.
सोलापूर रेल्वे विभागाने या संदर्भात विशेष प्रयत्न करून प्रवाश्यांच्या सेवांची पूर्तता केली आहे. तरी प्रवाशांनी या गाड्यांच्या तपशिलात झालेला बदल लक्षात घेऊन प्रवास निश्तिच करावे. असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाने केले आहे.
– योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सोलापूर रेल्वे विभाग.