कुंभारी नवीन विडी घरकुल परिसरातील अवैध व्यवसायवर कारवाईचा उगरणार बडगा
सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांचा इशारा
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १० जुलै – वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील नवीन विडी घरकुल, कुंभारी एस.एस.म्हेत्रे उर्दू हायस्कुल परिसरात अवैध धंद्यांबाबत दैनिकामध्ये बातमी प्रसारित झालेली होती. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी पोलिस कर्मचार्यांसह सदर भागामध्ये यापुर्वी वेळोवेळी परिणामकारक कारवाई केलेली आहे. तसेच आज रोजी सुद्धा पोलीस स्टाफसह हायस्कुलमधील दोन पंच व तक्रारदार यांचेसह हायस्कुलच्या परिसरात पायी पेट्रोलिंग करून तपासणी करून आढावा घेतला असता अवैध धंदे बंद असल्याचे दिसून आले. तसे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानंतर कुंभारी व नवीन विडी घरकुल परिसरात वळसंग पोलीस ठाणे वतीने जातीने लक्ष देवून स्थानिक गुन्हे शाखा पथक सोलापूर ग्रामीण यांचेसह मिळून आज रोजी प्रभावीपणे अवैध धंद्यांवर कारवाई केलेली आहे. त्यामध्ये दारूबंदी कायद्यांतर्गत 2 केस व जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 1 केसेस करून एकुण 3890/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
सदर आरोपीतांवर कायदेशिर कारवाई करीत असून या भागात अवैध धंद्यांवर प्रखरपणे कारवाई करून अवैध धंद्यांचा समुळ नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी सांगितले विडी घरकुल परिसरात दररोज नचुकता पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत आहेत. सदर भागात लक्ष ठेऊन पोलीस गस्त वाढविली आहे. जनसामान्यांनी पुढाकार घेवून आमचेशी संपर्क साधावा. पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर लक्ष ठेऊन आहे. अवैध धंदे मिळून आल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कोणीही अवैध धंद्यांना चालना देण्याचा प्रयत्न करू नये. सदर परिसरातील शालेय विद्यार्थी, महिला व सामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरण देण्याचा तसेच मद्यधुंद व्यक्तींवर अंकुश लावण्याचा पोलीसांचा नेहमीच प्रयत्न राहिल. दरची कारवाई मा पोलीस अधिक्षक सरदेशपांडे अपर पोलीस अधिक्षक यावलकर SDPO अक्कलकोट यामावार यांच्या आदेशाने वळसंग पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांचे मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाणेचे पोहेकॉ/अशोक पाटील, रामदास मालचे, सुनिल कुंवर, दिनेश काळोखे, मल्लीनाथ बंदिछोडे, पोकॉ/ शंकर पाटील, धरेप्पा व्हनमोरे, प्रसाद मांढरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक म.इसाक मुजावर, राजेश गायकवाड, पोहेकॉ/मोहन मनसावले, व चापोकॉ/ अशोक हलसंगी यांनी केलेली आहे.