सावधान ! अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्स, कमानी, होडींग्स लावल्यास होणार गुन्हा दाखल…
विधानसभा निवडणुक निकलाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयायाचे विभागीय अधिकाऱ्यांना आदेश !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२१ नोव्हेंबर –
अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्स, कमानी, होडींग्स, राज्यातील सर्व महानगरपालिका व पोलिस प्रशासन यांना निष्कासन, कारवाई व गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने सोलापूर महानगरपालिका दि.२२/११/२०२४ ते दि.३०/११/२०२४ या कालावधीत विशेष मोहिम राबवून सर्व अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्स, कमानी, कटआऊटस निष्कासनाची कार्यवाही संबंधित विभागीय कार्यालयामार्फत पोलिस विभागाच्या सहकार्याने करणार आहे. याशिवाय उच्च न्यायालय मुंबई यांनी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर यांच्या निष्कासनाची कार्यवाही करताना आढळणाऱ्या अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्स लावणाऱ्या व्यक्ती संस्था / राजकीय पक्ष यांचीही माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान महाराष्ट्रविधान सभा सार्वत्रिक निवडणूकीच्या निकालाच्या अनुषंगाने अनधिकृतपणे होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी लागण्याची शक्यता गृहित धरुन उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र शासन, पोलिस प्रशासन व इतर प्राधिकरणांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. निकालानंतर कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स वा होर्डिंग्स लागणार नाहीत यासाठी पोलिस प्रशासनासही आवश्यक सहाय्य उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहेत.
उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही स्वरुपाचे अनधिकृत होडींग्स, फ्लेक्स, बॅनर्स किंवा पोस्टर्स लागणार नाहीत याची दक्षता घेण्याचे व लावल्यास त्यांचे तात्काळ निष्कासन करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व विभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत. तसेच सर्व राजकिय पक्ष, कार्यकर्ते व सोलापूर शहर वासियांना सोलापूर महानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेत स्थळावर online परवानगीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली, असून सदरील संकेतस्थळावरुन परवानगी प्राप्त करुनच फ्लेक्स पोस्टर्स बॅनर्स लावण्यात यावे असे आवाहन करण्यात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शितल तेली उगले यांनी केले आहे.