आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदेच्या गजरात इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव शक्तीदेवीची उत्साही मिरवणूक ; मोटरसायकल रॅलीने वेधले लक्ष

आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदेच्या गजरात इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव शक्ती देवीची उत्साही वातावरणात प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक संपन्न….!

एक हजाराहून अधिक मोटर सायकल रॅलीनीं वेधले सर्वांचे लक्ष……!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.०५ ऑक्टोंबर – आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे चा जयघोष करीत ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची मिरवणूक मोठ्या उत्साही वातावरणात काढण्यात आली.

 गुरुवारी घटस्थापनेने नवरात्रोत्सवास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मंडळाचे संस्थापक व आधारस्तंभ लक्ष्मण जाधव, मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, मार्गदर्शक अनिल जाधव, यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षाप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होत आहे.

   ईच्छा भगवंताची मित्रपरिवार नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्तीदेवीची मिरवणूक रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी उद्योगपती शैलेश मुनाळे, सुरेश मुनाळे, यांच्या हस्ते इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीचे विधिवत पूजन व महाआरती संपन्न झाली. यावेळी उत्सव अध्यक्ष अंबादास गायकवाड (पटवर्धन चाळ )शिवाजी  गायकवाड, मोहन जाधव, अंबादास जाधव (शहा नगर) चंदू ब्रदर जाधव, आप्पासाहेब  बिलगुडे, रामकृष्ण मिस्त्री पल्ली, अल्लाबक्ष सय्यद, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, सागर कांबळे, सचिन पिसे, शिवा बंडगर पंडित शेटे , अमोल लकडे,सचिन आंगडीकर, शरद शिंदे, उमेश जाधव,हरीश तेलुगु,संतोष गायकवाड, सचिन गुत्तेदार, हुलगप्पा शासम, महादेव राठोड माणिक कांबळे, ऋषी येवले,  यांच्यासह इच्छा भगवंताची मित्र परिवारा नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी व शक्ती देवीचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान ढोल ताशाच्या गजरात हलगी व संबळाच्या निनादात एक हजारहुन अधिक मोटार सायकल रॅली काढण्यात आले. रेल्वे स्टेशन येथून                 या मिरवणुकीस प्रारंभ होऊन कुमार चौक डीआरएम ऑफिस मोदी पोलीस चौकी इराण वस्ती रामवाडी हॉस्पिटल आदिशक्ती माता चौक यामार्गावरून निघून इच्छा भगवंताची चौक सेटलमेंट येथे भव्य दिव्य मंडपात शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मिरवणुकीतील मोटरसायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाची शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *