भगवंताची परिवाराच्या वतीनं नामदार दत्तात्रय (मामा) भरणे यांचा सत्कार…

 भगवंताची परिवाराच्या वतीनं नामदार दत्तात्रय (मामा) भरणे यांचा सत्कार

धनगर समाजाचा वारसा असणारा काठी,घोंगडी आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देऊन केला विशेष सन्मान

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज 

सोलापूर, दि.२५ जून

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने इंदापूर येथील भरणेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी भरणे यांचा सत्कार केला.

    यावेळी रानावनात काट्याकुट्यातून थंडी, वारा, ऊन, पाऊस याचे कोणतेही काळजी न करता हातात काठी व अंगावर घोंगडी घेऊन आपला उदरनिर्वाह करणारा धनगर समाजाचे प्रतिक असणारे घुंगरू असलेली काठी, घोंगडी, भला मोठा हार, पिवळा फेटा आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

     नुकतेच दत्तात्रय भरणे मामा यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मध्ये आपला दवाखाना शुभारंभ आणि महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरातील काही क्षणचित्र फोटो अल्बम यावेळी दत्तात्रय भरणे यांना किसन जाधव यांनी सुपूर्द केले. यावेळी नामदार दत्तात्रय भरणे यांनी इच्छा भगवंताची परिवारात च्या वतीने आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजवंतांना आरोग्य सेवा मोफत मिळावी यासाठी त्यांचे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी नामदार भरणे यांनी काढले.

     याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष हनुमंत कोकाटे,इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकाळ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, युवा उद्योजक शरदराव शिंदे, संतोष किसन गायकवाड हुडको,माऊली जरग,महादेव राठोड,आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *