ईच्छा भगवंताची संस्थेच्या मोफत सर्व रोग निदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद ; असंख्य रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ…
मोफत आरोग्य शिबिरामुळे लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल जागृत होण्यास मदत होते – आमदार देवेंद्र कोठे
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१ जून
ईच्छा भगवंताची सामाजिक संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि ईच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक तथा आधारस्तंभ लक्ष्मण जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड आणि प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक २२ येथील सेटलमेंट ग्राउंड(मरगू मास्तर मैदान) येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर आणि आपला दवाखाना या आरोग्य सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आ.देवेंद्र कोठे, इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, राष्ट्रवादी शहर सेक्रेटरी प्रमोद भोसले, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष संगीता जोगदंनकर, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलनाने या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. असंख्य गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी बोलताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की, किसन जाधव हे नेहमीच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमी पाठपुरावा करीत असतात कोट्यावधी रुपयांचे कामे त्यांनी प्रभाग २२ विकासासाठी खेचून आणले.
तत्पूर्वी प्रास्ताविकात सर्वसामान्य नागरिकांना व गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने आपला दवाखाना या आरोग्य सेवा सुरू करण्यात आली. यापरिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाचे आरोग्य सेवा उपलब्ध होईल अशी खात्री किसन जाधव यांनी व्यक्त केली. आ.देवेंद्र कोठे यांनी इच्छा भगवंताची परिवाराचे सर्वेसर्वा संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक तौफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव इरफान शेख,आसिफ राजे शेख, सलीम नदाफ, वसीम शेख, जावीर जे.डी, साबील आडते, अखिल नाईकवाडी, आदींची उपस्थिती होती. तर सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत जाधव,विनोद गायकवाड, उमेश जाधव,शरद शिंदे, सचिन गुत्तेदार, संतोष ऋतिक गायकवाड, हरीश तेलुगु, संतोष लोंढे, अमोल जगताप,किरण शिंदे, प्रथमेश पवार, संजय सांगळे, प्रज्ञासागर गायकवाड दिनेश आवटे, शितल शिरसागर, किरण सगटे, तेजस गायकवाड, कार्तिक जाधव, माणिक कांबळे, आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे, सविता कोळी पंढरपूर यांनी केले.