सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नवे एमआरआय मशीन मंजूर…
एम.आर.आय मशीनमुळे गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य रुग्णांचा होणार फायदा -किसन जाधव
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आ. देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यातून नुकतेच पुणे येथील राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत नूतन एम आर आय मशीन साठी मंजुरी मिळाली. यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यासह इतर राज्यातील कष्टकरी सर्वसामान्य रुग्णांना या एमआरआय तपासणीसाठी उपयोग होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना एमआरआय तपासणी करण्यासाठी खाजगी रुग्णालयात एम आर आय तपासण्यासाठी जावे लागत होते. तपासणी केल्याशिवाय रुग्णांना अन्य पर्याय नव्हता यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. खासगी रुग्णालयातील दर देखील परवडणारे नसल्याने रुग्णांची हेळसांड होत होती.
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे एम आर आय मशीन उपलब्ध व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून सर्व स्तरातून मागणी होती. अखेर आ. देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना तसेच रुग्णांना दिलासा मिळाला. एम आर आय मशीन उपलब्ध केल्याबद्दल इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी आ.कोठे यांचा मखमली टोपी शाल पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार केला. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड महादेव राठोड, माणिक कांबळे, यांच्यासह इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
महायुती सरकारच्या माध्यमातून सोलापूर सिविल हॉस्पिटल येथे अत्याधुनिक तपासण्या, आणि रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील आहे.
देवेंद्र कोठे, आमदार सोलापूर शहर मध्य विधानसभा.
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे एम आर आय तपासणी मशीन नसल्यामुळे कर्नाटक आंध्र तेलंगणा या सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते रुग्णसेवेचा वसा घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल साठी नवे एम आर आय मशीन मंजूर केल्याने आता या मशीनचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबांना होणार आहे.
किसन जाधव, माजी गटनेते सो.म.पा.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी