आय.सी.सी.टी २० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने

आय.सी.सी.टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. साखळी फेरीत भारतीय संघाने ४ सामने खेळले आहेत. या ४ पैकी ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर १ सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता.२० जूनपासून भारतीय संघाचे सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. दरम्यान हे सामने भारतात किती वाजता पाहता येतील?

भारतात किती वाजता सुरु होतील सुपर ८ फेरीतील सामने?

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांचा थरार वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. भारत आणि वेस्टइंडिजमधील वेळेत ९:३० तासांचा फरक आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या सामन्यांती वेळ बदलणार का? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. तर भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज अशी आहे की, आयसीसीने भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी योग्य वेळेची निवड केली आहे.

भारतीय संघाचे साखळी फेरीतील सामने न्यूयॉर्कमध्ये खेळले गेले होते. हे सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरु झाले होते. तर भारतीय वेळेनुसार हे सामने रात्री ८ वाजता सुरु झाले होते. सुपर ८ मध्येही भारतीय संघाचे सुपर ८ फेरीतील सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट फॅन्सला रात्री उशीरापर्यंत किंवा पहाटे लवकर उठून सामने पाहायचे कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

भारतीय संघाचे सामने कोणत्या संघाविरुद्ध?

भारतीय संघाने अ गटातून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचे सुपर ८ फेरीतील सामने बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या ३ संघांमध्ये रंगणार आहे. २० जून रोजी भारतीय संघाचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. तर २२ जून रोजी भारतीय संघाचा दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर २४ जून रोजी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *