उड्डाण पुलाच्या कामाचा आ. विजयकुमार देशमुख यांनी पाहणी करून घेतला आढावा
कृषी उत्पन्न बाजार समितीचा चौक होणार अपघातमुक्त १८ महिन्यांत काम होणार पूर्ण
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २३ जून – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील चौक आता लवकरच अपघात मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. बाजार समिती समोर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर २ किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ५० कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे. त्याचा कार्यारंभ आदेशदेखील प्राप्त झाला असून लवकरच या कामात सुरुवात होणार आहे. त्याची पाहणी आ. देशमुख यांनी सोमवारी केली.

उड्डाण पुलाबाबत शनिवारी बैठक –
सोलापूर शहरातील दोन उड्डाण पुलाबाबत येत्या शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे. दोन्ही उड्डाणपूलांचे काम लवकरात लवकर सुरू करुन लवकर पूर्ण व्हावे याबाबत चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समोरील २ किमी लांबीच्या उड्डाणपुलासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि शेळगीला जाण्यासाठी सर्व्हिस रोड करण्यात येणार आहे.
-अनिल विपत, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
वारंवार होणाऱ्या जीवघेण्या रस्ते अपघात आणि वाहतूक खोळंब्यावर उपाय म्हणून माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी उड्डाणपूलासाठी निधी मंजूर करवून घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.
-नागेश उंबरजे, नागरिक