बेघर लाभार्थ्यांच्या रखडलेल्या घरकुलास होणार लवकरच सुरुवात ;

बेघर लाभार्थ्यांच्या रखडलेल्या घरकुलास होणार लवकरच सुरुवात ;

 राज्य सरकारकडून वैभव गंगणे यांच्या मागणीची घेतली दखल 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२० मे 

सोलापूर शहर व जिल्ह्यामधील बेघरांना तत्काळ निवासस्थानाची व्यवस्था करून देण्यात यावी. या मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री अदिती तटकरे यांना वैभव गंगणे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिले होते. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सुरू असलेले घरकुलांचे काम तांत्रिक अडचणी मुळे प्रलंबित होते. त्यामुळे अनेक बेघर सोलापूरकरांना त्याचा लाभ घेता येत नव्हता.या समस्या तातडीने सोडवून पूर्ववत घरकुलांच्या प्रकल्पास सुरुवात करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात केली होती.

     दरम्यान, याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत, तांत्रिक अडचणीची माहिती जाणून घेत प्रकल्पाच्या कामास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सोलापुरातील बेघरांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे.

शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूरकरांना विविध योजनेंचा लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी प्रामाणिक पणे कार्यशील राहू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी दिलीय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *