हिप्परगा तलावातील पूर्ण गाळ काढण्याची पुन्हा एकदा होतीय मागणी…..
हिप्परगा तलावातील हेलकावे खाणारे पाणी
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २९ जुलै – सोलापूर शहरालगत असणाऱ्या हिप्परगा तलावात पाण्याची पातळी थोड्याफार प्रमाणात वाढलेली दिसत आहे. गेल्या काही नक्षत्राच्या पावसामुळे सदरची वाढ झाली आहे. आगामी पाऊसमान चांगल्या पद्धतीने झाल्यास पाणी आणखीन वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शहराच्या लगत असणाऱ्या आणि सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या हिप्परगा तलावात पाणी पातळी वाढलेली दिसून येत आहे. गेल्या एक-दोन महिन्यात पुनर्वसु मृग नक्षत्राच्या पावसाने शहरात आणि आसपासच्या परिसरात दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर वाढल्याने हिप्परगा तलावात देखील पाणीसाठा वर आला आहे. हिप्परगा पंप हाऊस या ठिकाणी पाणी पातळी पाहिली असता. पूर्वीच्या पाणी प्रमाणात बदल होऊन पातळी वाढलेली दिसत आहे. तलाव परिसरात गार वारा वाहत असल्याने तलावातील पाण्याला एखाद्या लाटाचे स्वरूप आले आहे की काय असा भास निर्माण होत आहे. दरम्यान हिप्परगा तलावात पाणीसाठा वाढल्याने सोलापूर शहरासह हिप्परगा गावाचा पाण्याचा प्रश्न बहुतांशी मार्गी लागणार आहे. मुबलक स्वरूपात पाणी साठा झाल्यानंतर नैसर्गिक दृष्ट्या हे पाणी सोलापूरच्या पाणी गिरणीमध्ये येईल. त्यामुळे हिप्परगा तलावातील पाणीसाठ्याने सोलापूर शहरातील नागरिकांची तहान भागणार आहे. सध्या तलावातील पाण्याचा गावकरी वापर करतात. त्यामुळे हे पाणी शुद्ध करण्याचे गरजेचे आहे. पाणी गिरणीत पाणी शुद्ध केल्यानंतर त्याचे नियोजन करून शहरासाठी उपयोगात आणले पाहिजे.
हिप्परगा तलावातील पूर्ण गाळ काढण्याची पुन्हा एकदा होतीय मागणी……
हिप्परगा तलावाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि पठाराचा प्रदेश आहे. यापूर्वी महायुतीच्या शासनाने माजीमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून हिप्परगा तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते.परंतु ते काम म्हणावे तसे पूर्णत्वास गेले नाही. मागील उन्हाळ्यात त्यावर शासनाने आणि संबंधित जलसंपदा विभागाने पुन्हा एकदा नव्याने कामकाज सुरू करण्याची गरज होती. जेणे करून पाणीसाठ्यात आणखीन वाढ होऊन गावातील पाणी प्रश्न मिटेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.