शॉर्टकट ठरतोय धोक्याची घंटा!…निष्पाप बळी जाण्यापूर्वी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज : शॉर्टकट घेण्याच्या नादात अक्कलकोट हायवे बनतोय मृत्यूचा सापळा
सोलापूर व्हिजन दिनांक अक्कलकोट हायवे मृत्यूचा सापळा बनत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणचे स्थानिक नागरिक रस्ता क्रॉस करण्यासाठी हायवे वरून जीवघेणी कसरत करताना दिसत आहेत. यामध्ये महिला आबालृद्ध नागरिक हायवे वरील दुभाजक क्रॉस करत आहेत मात्र ही कसरत मृत्यूला कारणीभूत ठरणारी आहे यावर प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गणराज निर्माण झाली आहे. रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या महिला आणि युवक दररोज सर्रासपणे अशाप्रकारे रस्ता क्रॉस करत आहेत. एखादे भरधाव वेगात येणारे वाहन नागरिकांच्या मृत्यूलां कारणीभूत आणि धोका ठरत आहे. संबंधित नागरिक याकडे कानाडोळा करून रस्ता क्रॉस करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान अक्कलकोट रोड आणि शांती चौका नेहमीच अपघाताचा केंद्रबिंदू ठरला आहे. या ठिकाणी आणि अक्कलकोट रस्त्यावर वारंवार अपघात होऊन दुःखद घटना घडते. अशा घटनेला आपण कारणीभूत ठरू नये असे विचार नागरिकांना करायला हवेत मात्र शॉर्टकट घेण्याच्या नादात स्थानिक मृत्यूला आमंत्रण देत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे याकडे नॅशनल हायवे पोलीस प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा एखाद्या निष्पाप जीवाचा बळी गेल्याशिवाय राहणार नाही..