सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक:- सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना तसेच शहरातील शहराबाहेरुन येण्या-या सर्व जड वाहनधारकांना सिटी बस, एस्टी बस, ट्रक, ट्रेलर इ. वाहनांसाठी सुचित करण्यात येत आहे भैय्या चौक ते मरी आई चौक या दरम्यान असणारा रेल्वे ट्रॅक वरील पूल १०० वर्षा पूर्वी तयार झालेला होता, तो जीर्ण अवस्थेत असल्यामुळे तो धोकादायक झालेला आहे.
त्यामुळे सदर रेल्वे पूलावरील जड वाहतूक पूर्ण पणे बंद करण्यात आले आहे. त्या पुलावर 2.4 मिटरचा हाईट गेज लावण्यात आले आहे. तरी दि.16 जुन 2024 पासून सदर रेल्वे पूलावरुन जड वाहनाची वाहतूक बंद करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे विभागास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.