श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि आश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबीर

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि आश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबीर…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.१२ डिसेंबर

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी इंदिरा कन्या प्रशाला डाळींबी आड शिंदे चौक येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात बालरोग तपासणी, त्वचा रोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दमा तपासणी, पोटाचे विकार तपासणी, अस्तिरोग तपासणी, मेंदूचे विकार तपासणी, पक्षाघात तपासणी, संधिवात तपासणी, इ सी जी तपासणी, बी पी तपासणी, शुगर तपासणी, स्त्रीरोग तपासणी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी करण्यात येणार आहे, या शिबिरात अश्विनी सहकारी रुग्णालयाचे नामांकित डॉक्टर सहभागी होणार असून ते रुग्णांची तपासणी करणार आहेत, या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *