श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि आश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबीर संपन्न
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१४ डिसेंबर
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि.१४ डिसेंबर रोजी इंदिरा कन्या प्रशाला डाळींबी आड शिंदे चौक येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे, घाडगे गुरुजी, राजन जाधव, चंद्रकांत वानकर, श्रीकांत डांगे, श्रीकांत घाडगे, माऊली पवार, बाबासाहेब जाधव, शैलेश पिसे, भाऊसाहेब रोडगे, लहू गायकवाड, जितू वाडेकर , सदाशिव पवार, जीवन यादव, दिनेश जाधव, प्रतापसिंह चव्हाण, जयवंत सलगर, जयंत शेळके, प्रकाश ननवरे, बसू कोळी, अंबादास शेळके, विवेक फुटाणे ,बजरंग जाधव ,नागेश वडणे नितीन मोहिते सचिन चव्हाण ,राजू व्यवहारे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती

या शिबिरात बालरोग तपासणी, त्वचा रोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दमा तपासणी, पोटाचे विकार तपासणी, अस्तिरोग तपासणी, मेंदूचे विकार तपासणी, पक्षाघात तपासणी, संधिवात तपासणी, इ सी जी तपासणी, बी पी तपासणी, शुगर तपासणी, स्त्रीरोग तपासणी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी करण्यात आली, या शिबिरात अश्विनी सहकारी रुग्णालयाचे आरएमओ डॉक्टर कविता सोनकांबळे, डीएमओ डॉक्टर रमेश जक्कापुरे, डॉक्टर संतोष स्वामी झ डॉक्टर सचिन चौधरी, डॉक्टर प्रणव पाटील, डॉक्टर राजकुमार बहिरप्पा, अवधूत कुलकर्णी, उमेश शिवशरण, उज्वला लांबतुरे यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते
रुग्णांची तपासणी केली, या शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला असून महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून महाजनसेवा करण्याची संधी मिळाल्याचे मनोगत माजी उपमहापौर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे यांनी व्यक्त केले
महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिन स्वामी, देविदास घुले, निशांत सावळे यांच्यासह अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.