श्रीगुरूपौर्णिमेचा शहरात अभूतपूर्व उत्साह ;
सुंदरम नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची मांदियाळी ; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २० जुलै – गुरूब्रम्हा गुरुरविष्णू तस्मैसी गुरुवे नमः श्री गुरुपौर्णिमे निमित्त शहरातील सुंदरम नगर येथील श्रीस्वामी समर्थ मंदिरात उत्साह दिसून आले. सकाळपासूनच श्रींचे दर्शन घेण्यासाठी अबालवृद्ध आणि महिला भाविकांची मंदिर परिसरात मांदियाळी होती.
श्रीगुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मानवाच्या जीवनात प्रत्येकाला गुरू असणे आवश्यक आहे. याच गुरू पार्श्वभूमीवर शहरातील सुंदरम नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार दिनांक १८ जुलै पासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये गुरुलीलामृत पोथीचे सामूहिक पारायण करण्यात आले. त्यानंतर शुक्रवार दिनांक १९ जुलै रोजी स्वरध्यास विद्यालय प्रस्तुत भक्ती संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रसिका आणि सानिका कुलकर्णी यांनी गीत सादर केले. त्यानंतर शनिवार दिनांक २० जुलै रोजी पोथी पारायण तसेच उषःकाल महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता संपन्न झाला.
दरम्यान रविवार दिनांक 21 जुलै रोजी पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ मूर्ती रुद्राभिषेक आणि रुद्रस्वाह धार्मिक विधी करण्यात आला. त्यांचा सकाळी स्वामी समर्थ सारामृत पोथीचे सामूहिक पारायण सकाळी ९ वाजता करण्यात आले.यावेळी भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता अनेकांनी अन्नदानाच्या पवित्र कार्यात सहभाग नोंदवला.याप्रसंगी डॉ. हेडगेवार रक्तपेढी आयोजित रक्तदान शिबिर देखील संपन्न झाले.
याप्रसंगी मंदिर परिसरात अनामिक नवचैतन्य आणि प्रसन्नता होती. याप्रसंगी मंदिरातच महिला भाविकांची सामूहिक पोथी पारायण करण्यासाठी एकच मंदियाळी दिसून आली.