वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटनेचे काळ्या फितीचे असंतोष आंदोलन

वस्तू व सेवा कर पुनर्रचना रद्द करा – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटनेचे काळ्या फितीचे असंतोष आंदोलन

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि १० जुलै – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागात मंजूर झालेली पुनर्रचना आणि त्याअनुषंगाने झालेल्या सुधारित आकृतीबंध यामध्ये विभागातील कर्मचारी संवर्गावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटना, मुंबईच्या वतीने संपूर्ण राज्यात दिनांक ९ व १० जुलै २०२४ रोजी काळ्या फितीचे असंतोष आंदोलन करण्यात येत आहे.

                   त्याच पार्श्वभूमीवर बदललेल्या पुनर्रचना आणि आकृतीबंधाच्या विरोधात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटनेने आज काळ्या फितीचे असंतोष आंदोलन केले. यावेळी सोलापूर शहरातील जीएसटी भवन समोर विविध घोषणा देत कर्मचाऱ्यांनी सरकारला धारेवर धरले. जी. एस. टी. भवन, सोलापूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यासभेस  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सोलापूर शाखेचे अमृत कोकाटे सरचिटणीस, महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनु गायकवाड, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस अशोक इंदापूरे, वस्तू व सेवा कर संघटनेचे विभागीय सदस्य कुलदीप गवळी, गोपाळ यरगल प्रमुख पदाधिकारी  यांनी मार्गदर्शन करीत या आंदोलनास शीर्ष संघटनेचा पाठिंबा जाहीर केला.

               दरम्यान याआंदोलनास वस्तू व सेवा कर गट-ड कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र वस्तू व सेवा कर राजपत्रित अधिकारी संघटनेने देखील जाहीर पाठींबा दर्शविला.  यावेळी वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून शासन-प्रशासनाचा लक्षवेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या.

सोलापूर जिल्ह्याचे वस्तू व सेवा कर ऑडिट करण्यासाठी यापुढे कोल्हापूरला जावे लागणार आहे. सोलापुरातील जीएसटी भवन अद्यावत असताना देखील सोलापूरसाठी वेगळे ऑडिट करणे गरजेचे आहे अनेक अडचणींना सामोरे जाऊन आम्हाला सदरचे काम करावे लागत आहे त्यात आणखीन नव्या समस्या निर्माण होत आहेत. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. 

– वस्तू व सेवा कर निरीक्षक  , सोलापूर जीएसटी भवन

ग्रामीण भागामध्ये अधिकारी ऑडिट करण्यासाठी येत नसतात . त्यांच्या या मनमानी कारभारामुळे स्थानिक जीएसटी भवन मधील विविध कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना या बदलत्या धोरणामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोलापूरचे जीएसटी भवन अद्यावत आणि मोठ्या स्वरूपात असताना देखील केवळ अधिकाऱ्यांच्या दबावापोटी निर्णय बदलून कोल्हापूरमध्ये ऑडिट स्थलांतर करण्यात आल्याने संघटना आक्रमक झाली आहे. येणाऱ्या काळात आकृतीबंध आणि त्याची पुनर्रचना तात्काळ रद्द करावी.

अशोक इंदापूरे , कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *