श्रीसिद्धेश्वर यात्रेनिमित्त मानाच्या नंदीध्वजाचे सोमनाथ केंगळकर परिवाराच्या वतीने विधिवत पूजन…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.०६जानेवारी
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची गड्डा यात्रा दृष्टीक्षेपात आली आहे. गड्डा यात्रेतील श्री सिद्धेश्वर महाराजांचे योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वजांचे पूजन भाविकांच्या घरोघरी मोठा उत्साहपूर्ण वातावरणात होत आहे. यात्रा काळात मानाचे नंदीध्वजांचे पूजन शुभ मानले जाते. त्याअनुषंगाने भक्तगण आपल्या घरी नंदीध्वजांचे पूजन करून श्रीचरणी प्रार्थना करत आहेत. या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान, त्याचं अनुषंगाने अशोक चौक येथील सोमनाथ केंगनाळकर परिवाराच्या वतीने सिद्धेश्वर यात्रेतील मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाच्या पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोमनाथ केंगारकर दाम्पत्याच्या वतीने पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली.
यावेळी मानाचे नंदीध्वज विविध प्रकारच्या रंगबिरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते. यावेळी मानाच्या नंदीध्वजाचे पूजन झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी सर्वत्र चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. याप्रसंगी श्री सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी, नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी, पुरोहित, भाविक भक्त आणि केंगनाळकर मित्रपरिवार उपस्थित होते.