प्रमुख मानकऱ्यांच्या घरी दिवे प्रज्वलित करून श्री सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.०९ जानेवारी
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. यात्रेतील प्रमुख मानकरी दर्गोपाटील, धुम्मा, मुस्तारे, मसरे, कळके, हब्बू यांच्या घरी दिवे प्रज्वलित करून तसेच यात्रेचे प्रमुख हिरेहब्बू यांचे पाद्यपूजन करून आज बुधवारपासून यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी मानकरी सुहास दर्गो पाटील यांच्या घरी दिवे प्रज्वलित करण्यात आले. तद्नंतर यात्रा प्रमुख राजशेखर हिरेहब्बू, राजू हब्बू,अमित हब्बू, शिवकुमार हब्बू, यांचे पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी देवघरात श्रींचे पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली.
दरम्यान, ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर यात्रेतील विविध धार्मिक विधींना परंपरेनुसार आजपासून प्रारंभ झाला आहे. यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेचे इतर मानकरी दर्गोपाटील, धुम्मा, मुस्तारे, मसरे, कळके, हब्बू, यांच्या घरी देखील दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी भाविकांना प्रसाद वाटप केला गेला. सदरची ही परंपरा वर्षानुवर्षे अखंडपणे सुरू आहे.
यावेळी महानंदा दर्गोपाटील,धनंजय बंडे,प्रशांत बंडे,श्रुती बंडे, प्राजका हेले, पदमावती दर्गोपाटील,नीरज मानवी, प्रभुराज मानवी, प्रियांश हेले, दर्श बंडे, सिद्धराज कुताटे, जोतीरादित्य दर्गोपाटील,माधवी निलवेगी, मल्लिनाथ मुस्तारे, बाळासाहेब मुस्तारे आनंद मुस्तारे, सागर मुस्तारे, महादेवी मुस्तारे, विजया मुस्तारे, सुनंदा मुस्तारे, संगीता मुस्तारे, अश्विनी मुस्तारे आदींची उपस्थिती होती.