शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनी भाजपा साथ द्यावी :- मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

सन २०१४ नंतरच्या भारतात विकासात्मक बदल :-  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२९ ऑक्टोंबर – पूर्वीचा भारत आणि नंतरचा भारत यामध्ये फार मोठा बदल झाला काँग्रेसच्या काळात गरिबी हटावचा नारा दिला पण तो पूर्ण झाला नाही. पंतप्रधान मोदींनी तळागाळातल्या कष्टकरी जनतेसाठी अनेक योजना प्रत्यक्षात आणून देशाला प्रगतीपथावर आणले. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा याचे भाग होण्याचे विधान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी लिंगशेट्टी मंगल कार्यालयात विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या हितगुज मेळाव्यात व्यक्त केले.

          यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजयुमो  शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख, निमा संस्थेचे संयोजक डॉ.अभिजीत लोणावत, डॉ. विनायक टेंभुर्णीकर,डॉ. नागनाथ जीट्टीमनी,डॉ.सागर जगताप, डॉ. प्रशांत हुल्ले, माजी नगरसेवक संजय कोळी,प्रा.नारायण बनसोडे आदींची उपस्थिती होती. स्वच्छ भारत योजना, उज्वला गॅस योजना, हर घर शौचालय, हर घर जल, आयुष्यमान योजना, लाडकी बहिणी योजना, हर घर बिजली, हर गाव सडक योजना, उडान योजना, जन औषधी, अंत्योदय योजना अशा अनेक योजना स्थिर सरकारमुळे पंतप्रधान मोदी यांना शक्य पूर्वी देशामध्ये दहा कोटी लोकांचे बँकेत खाते होते. आज मात्र ५० कोटी लोकांचे बँकेमध्ये खाते आहेत. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचं सरकार आलं तरच असे विधायक कार्य कायमस्वरूपी करण्यात येतील.

 

       आपल्या देशात अनेक विकासात्मक योजना आल्याने आपल्या वैद्यकीय क्षेत्रात सेवा पुरवणारे संस्थांना   युवाशक्ती किसान शक्ती नारीशक्ती आणि गरीब शक्ती देशातील या चार घटकांवर मोदी सरकार काम करीत आहे. ऑनलाइन टेक्नॉलॉजी मुळे पूर्ण विश्व आज जवळ आला आहे. राम मंदिर, जम्मू काश्मीर येथील निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले. यामुळे राज्यात आणि केंद्रात एकाच विचारच सरकार यावं आणि भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना शहर उत्तर मधील डॉक्टर आणि नागरिकांनी निवडून द्यावं असे आवाहन मुख्यमंत्री सामंत यांनी यावेळी केले.

 आमच्या मतदारसंघात आणि शहरात मागील दहा वर्षात स्थिर सरकारमुळे अनेक सोयी सुविधा आम्ही देऊ शकलो. आरोग्य क्षेत्रात आज प्रत्येक परिवाराला आयुष्यमान कार्ड अंतर्गत पाच लाख रुपयाची सोय केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. आमच्या मतदारसंघातील अनेक नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेकांना मदत मिळवून दिले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पदावर असताना या शहरासाठी १०० महिलांसाठी स्वतंत्र अद्ययावत महिला हॉस्पिटलची निर्मिती केली आणि आज ती निशुल्क पद्धतीने सेवा देत आहे. मागील वीस वर्षापासून मतदारांनी जो माझ्यावर विश्वास दाखविला त्यामुळे अनेक विकासाची कामे करता आली. याचे श्रेय विधानसभेतील नागरिकांना आहे. असंच पाठबळ आपण पुन्हा एकदा द्यावं असं आवाहन आमदार विजय देशमुख यांनी यावेळी केले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीस धनत्रयोदशीच्या निमित्ताने धन्वंतरी आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत लोणावत यांनी केले. भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सोलापूर शहरातील २०० हून अधिक डॉक्टर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयएमए आणि निमा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *