गवळी समाज सांस्कृतिक भवनाच्या स्लॅब टाकणीचा भव्य शुभारंभ; ५० लाखांच्या निधीमुळे समाजाच्या विकासाला मिळणार गती
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ नोव्हेंबर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या पाठबळातून मोदी खाना परिसरात गवळी समाज सांस्कृतिक भवन उभारणीसाठी मंजूर झालेल्या ५० लाख रुपयांच्या निधीअंतर्गत स्लॅब टाकण्याच्या कामाचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न झाला.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला. गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून समाजाच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पुढील काळातही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन किसन जाधव यांनी यावेळी दिले..

शुभारंभ प्रसंगी गवळी समाजाचे अध्यक्ष मोहन घुले, नाना कलागते, मारुती दिवटे, अमर नायको, मयूर गवळी, मनोज उच्चे, गणेश कारभारी, अमोल कोकरे, मकरंद कदम, कोकरे सर,माणिक कांबळे, वसंत कांबळे, फिरोज पठाण, महादेव राठोड, आनंद गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून कामाची सुरुवात करण्यात आली.

या सांस्कृतिक भवनामुळे गवळी समाजातील बांधवांना अत्यंत माफक दरात छोटे-मोठे घरगुती तसेच सामाजिक कार्यक्रम आयोजित करता येणार असून समाजातील ऐक्य, संवाद आणि सांस्कृतिक जडणघडण अधिक बळकट होणार आहे. कार्यक्रमास गवळी समाजातील नागरिकांसह प्रभागातील रहिवाशांनीही मोठी उपस्थिती दर्शविली. गवळी समाजाचे ‘हक्काचे सांस्कृतिक भवन’ उभारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे समाजातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.