Gas Price | घरघुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार

Gas Price

Image Source 

Gas Price | घरघुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहेत. याबाबत मंत्री अनुराग कश्यप यांनी माहिती दिली.

देशातील वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशातच मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट करण्याचा निर्णय घेतला असून आता देशभरात गॅस सिलेंडरचे दर हे 200 रुपयांपर्यत कमी होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

Gas Price कमी करण्याच्या प्रस्तावामुळे आता देशभरात त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, आगामी काळात राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्याआधी मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतेय.

Gas Price

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *