आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मध्ये वाढली इच्छुकांची भाऊ गर्दी….. मध्य वर अनेकांचा डोळा तर दक्षिण काबीज करण्याचा आखला मनसूबा…

काँग्रेस पक्षाकडे तब्बल ६१ इच्छुक उमेदवारांनी केले उमेदवारी मागणीचे अर्ज दाखल…..

शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांची माहिती……

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि १० ऑगस्ट – राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोंबर २०२४ मध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार , माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा.प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट होती.

दरम्यान आत्तापर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघ पैकी ०९ विधानसभा मतदारसंघातून एकूण ६१ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शहर अध्यक्ष चेतन नरोटे व जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांच्याकडे दाखल केले आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवार

 २४८ – सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश वाले, उदय शंकर चाकोते, सुदीप चाकोते, सुनील रसाळे, सुशील बंदपट्टे, राजन कामत, सातलिंग शटगार, या ०७ जणांनी उमेदवारी मागितली आहे.

 २४९- सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, अरिफ शेख, रियाज हुंडेकरी, फिरदोस पटेल, देवेंद्र भंडारे, अंबादास बाबा करगुळे, जुबेर कुरेशी, शकील मौलवी, शौकत पठाण, रुस्तम कंपली, हसीब नदाफ, मैनुद्दीन शेख, महिबुब (M.D.) शेख, असिफ इकबाल, रियाज सय्यद, सुधाकर बनसोडे, राहुल ओव्हाळे, या १८ जणांनी उमेदवारी मागितली आहे.

२५१- दक्षिण विधानसभा मतदारसंघासातून दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री, बाळासाहेब शेळके, महादेव कोगनुरे, अशोक देवकते, सुभाष चव्हाण, हरीश पाटील, सुदीप चाकोते, फिरदोस पटेल, जाफरताज पटेल, शालिवाहन माने देशमुख, भोजराज पवार, विजयकुमार हतुरे, प्रशांत कांबळे, रफिक काझी, चिदानंद सुंटे, रजाक मुजावर, रुकय्याबानू बिराजदार या १९ जणांनी उमेदवारी मागितली आहे. 

२५० अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे, मल्लिकार्जुन महादेव पाटील, भीमाशंकर नागप्‍पा जमादार, पूजा राहुल पाटील (चिक्केहळ्ळी )

 २४७ मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार अँड. गजेंद्र गौतम खरात, किशोर नेताजी पवार,  प्रशांत पुंडलिक साळे, किशोरकुमार रघुनाथ सरदेसाई

 २४५ माढा विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार मीनल गणपतराव साठे, प्रा. संदीप वसंतराव साठे 

 २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपूरकर, अमोल राजेंद्र म्हमाणे, अँड.राविकिरण सुरेश कोळेकर, श्री.राजेश सिताराम लिगाडे (प्रदेश)

 २४६ बार्शी विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार अँड. इस्माईल तांबोळी, श्री.विजय बाळकृष्ण साळुंके   (प्रदेश)

 २५४ माळशिरस विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार प्रशांत पुंडलिक साळे

असे एकूण ६१  इच्छुक उमेदवारांनी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारीची मागणी केली आहे.

प्रवगा नुसार अर्ज शुल्क….

प्रत्येक अर्जासाठी राखीव आणि खुला या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क आकारण्यात आले होते. राखीव प्रवर्गासाठी दहा हजार तर खुला प्रवर्गासाठी वीस हजार रुपये अर्ज सादर करताना भरावयाचे होते. त्यानुसार प्रत्येक इच्छुकांनी शुल्क भरून अर्ज भरला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *