बापरे दोन दिवसानंतर सापडला कासेगावात मृतदेह ; या अवस्थेत मिळून आला पाण्यात

गावावर पसरली शोककळा…. जिल्हा प्रशासनाचा केला धिक्कार…..

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढ्याना पूर आला आहे, कासेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे मंगळवारी रात्री दुचाकी वरील तिघे वाहून गेले होते त्यापैकी दोघे वाचले पण दुचाकीसह तिसरा वाहून गेला होता. सकाळच्या सुमारास जिल्हा प्रशासन मार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये जवळच वाहून गेलेली दुचाकी सापडली आहे, परंतु युवक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू राहिला. तब्बल दोन दिवस दोन रात्रीच्या शोधा नंतर अखेर अर्धा किलोमीटर अंतरावर नवनाथ माने यांच्या बांधाच्या कडेला येड्या बाभळीच्या काट्यांमध्ये अडकलेल्या अवस्थेत फक्त डोके वर असलेला मृतदेह मिळून आला. कासेगाव मधील युवक प्रविण चौगुले, आण्णा चौगुले, जालिंदर चौगुले, सुरज परीट, अमोल जाधव, वैभव चौगुले, तुषार जाधव यांनी शोध घेतल्यानंतर हा मृतदेह मिळून आला आहे त्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला सांगितले असून ॲम्बुलन्स मागवण्यात आली आहे. ओढ्याच्या कडेने काटेरी जोडपे जास्त असल्याने दोन दिवस रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या यंत्रणेला हा मृतदेह दिसला नाही. शेवटी पाणी कमी झाल्यानंतर केवळ डोके वर आलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला असून अजूनही तो काटेरी झुडपांमध्ये अडकलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *