तो युवक अद्यापही बेपत्ता….
कासेगाव येथील ओढ्यात वाहून गेलेले ज्ञानेश्वर कदम यांचा मृतदेह आज दुसऱ्या दिवशीही सापडला नाही….
अंधार झाल्यामुळे आजचे शोधकार्य थांबवले उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य होणार सुरु….
सोलापूर व्हिजन न्युज दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पूलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघे जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. पाण्याचा अंदाज आणि रात्रीचा अंधार यामुळे सदरची दुर्दैवी घटना घडली यामध्ये ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचविण्यात यश आले तर ज्ञानेश्वर कदम अद्याप पर्यंत मिळून आला नाही. दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करत युवकाची दुचाकी शोधून काढली आहे मात्र अद्यापही युवक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.