बेकायदेशीर अवैध दारू धंदे बंद करा  राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर ठाकरे गटाची जोरदार निदर्शने

विजापूर  रोडवरील बेकायदेशीर अवैध दारू धंदे बंद करा ; राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर उबाठाची निदर्शने…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि १ एप्रिल 

सैफुल ते सोरेगाव सर्व्हिस रोडवर बेकायदेशीर दारू धंद्यांचा ऊत आला आहे. आयटीआय पोलीस चौकी जवळ असलेल्या चहा कॅन्टीन, चायनीज गाड्या, अंडा आम्लेट गाड्या व पान टपरींवर बिनधास्त दारूची विक्री चालू आहे. या व्यवसायांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा वरदस्त आहे. हप्ते घेऊन हे सदरचे व्यवसाय चालवले जात असल्याने  उद्धव बाळासाहेब ठाकरे  सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १ एप्रिल रोजी निदर्शने करण्यात आली.

ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क कार्यालय समोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

    दररोज सायंकाळी दुपारी रात्री उशिरापर्यंत या भागात दारुड्यांचा बाजार भरतो. या भागातील नागरिकांना चालणे चालत जाणे मुश्किल झाले आहे. या भागात शिक्षण देणारी आयटीआय सारखी शिक्षण संकुल आहे.इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. जवळच असलेल्या मंदिरासाठी चालत जाणाऱ्या महिलांना दारुड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वेळप्रसंगी छेडछाडीचे प्रकार घडत आहेत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने यापूर्वी निवेदन देऊन इशारा दिला होता. तरी देखील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही त्यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

    राज्यउत्पादन शुल्क विभागाचा अधिकार हप्ते घ्या अवैद्य धंदे चालू ठेवा, पाच हजार रुपये द्या ओपन परमिट रूम  चालवा सात हजार रुपये द्या ओपन दारू धंदा चालवा, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय असो असा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता..या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील, उपजिल्हाप्रमुख खंडू सलगरकर, उपशहर प्रमुख शिवा माळी, परमेश्वर देवकते, प्रशांत बिराजदार, रवी घंटे, सखाराम वाघ, संगप्‍पा कोरे, परमेश्वर देवकते, विनोद जाधव, कुमार शिंदे राकेश मालकोटे, विकास डोलारे आधी शिवसैनिक सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *