माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश 

सोलापुरात काँग्रेस पक्षाला धक्का : माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२९ नोव्हेंबर

सोलापुरात ऐन महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत बालाजी सरोवर येथे शनिवारी सकाळी माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

दरम्यान, अण्णा बनसोडे तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. मागील दोन दिवसात वकील मंडळींसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर शेवटच्या दिवशी सोलापूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी

काँग्रेस पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यात यश मिळवले.

अण्णा बनसोडे यांच्या हस्ते माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांच्या गळयात राष्ट्रवादीचे उपरणे घालून त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश देण्यात आला. काँग्रेसमधील मोठे प्रस्थ राष्ट्रवादीत आले आहे, लवकरच आणखी मोठे लोक राष्ट्रवादीत प्रवेश करतील,असे अण्णा बनसोडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अजित पवार यांची कार्य शैली महत्वाची असून याच पार्श्वभूमीवर आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हेत्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले. महापालिका निवडणूकीच्या तोंडावर आणखी मोठे राजकीय भूकंप सोलापूरकरांना पाहावयास मिळतील, असे जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *