सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे सोळा वर्षाखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…दिलीपराव माने चषकाचे झाले शानदार उद्घाटन…
सोलापूर व्हिजन प्रतिनिधी ,
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे सोळा वर्षाखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि.३ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात आले.

सोलापूरचे रणजी खेळाडू व सध्या रणजी क्रिकेट स्पर्धेचे निवड समिती सदस्य रोहित जाधव व नुकतेच आयपीएल स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी केलेले व सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अंपायर कमिटीचे चेअरमन अनिस सहस्त्रबुद्धे आणि राजा बागवान यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप माने (मालक) यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धा अलंकार ट्रेडिंग कंपनीचे मालक राजा बागवान, डी. एम. क्रिकेट अकॅडमी चे सुनील चव्हाण व एन.जी. क्रिकेट ॲकॅडमी चे निलेश गायकवाड यांनी पुरस्कृत केल्या आहेत.

याप्रसंगी १६ व १९ वर्षाखाली निवड समितीचे चेअरमन सुनील मालप १४ वर्षाखालील निवड समितीचे चेअरमन राजेंद्र गोटे, सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे टूर्नामेंट कमिटी चेअरमन संजय वडजे, निवड समिती सदस्य उदय डोके संजय मोरे, राजू रंगम क्रिकेट पंच चिराग शहा तसेच सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संतोष बडवे, विहान क्रिकेट अकॅडमी चे कोच श्री. योगेश कोम्पल, युनायटेड क्रिकेट क्लबचे कोच सुदर्शन लोखंडे, मल्लिनाथ चौधरी, विनोद पाटील हे उपस्थित होते.याप्रसंगी सर्व प्रमुख पाहुणे आयोजक व उपस्थित यांनी दिलीप माने (मालक) यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊन त्यांनी भविष्यात परत एकदा आमदार व्हावे अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाची प्रस्तावना सुनील चव्हाण यांनी केली. सूत्रसंचालन सुनील मालप यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. विष्णू गायकवाड यांनी केले. या स्पर्धा दि.१२ ऑगस्ट पासून दयानंद कॉलेज सोलापूर मैदानावर घेण्याचे नियोजन आहे. या स्पर्धा लीग पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामुळे खेळाडूंना जास्तीच जास्त सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.