माझा पक्ष काँग्रेस या मालकांची फेसबुक पोस्ट व्हायरल…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर,दि.२४ऑक्टोंबर – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. सुमारे ४८ उमेदवारांची नावे जाहीर करत शहर मध्य आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघ यावर अद्याप सस्पेन्स कायम ठेवला आहे. जागावाटपात साटलोट करण्यात आघाडी व्यस्त असताना दिसत आहे.
दरम्यान दुसरीकडे खुद्द माने मालकांनी जाहीररित्या फेसबुक पोस्ट करत काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवत, पक्षाला पाठिंबा दिला आहे. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याला लाइक्स मिळत आहेत. पहा फेसबुक पोस्ट
हीच ती फेसबुक पोस्ट
माझा काँग्रेस पक्ष, त्याचे नेतृत्व आणि काँग्रेसच्या विचारधारेवर संपूर्ण विश्वास आहे. आपल्या काँग्रेसचा पारंपारिक सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार आहे आणि तो आपणच लढवणार आहोत..! आपल्याला आजवर मिळालेला जनतेचा पाठिंबा आणि विश्वास कायम ठेवत, आपण आहे त्यापेक्षा जास्त जोमाने आपला प्रचार सुरूच ठेवूया..! चला, परिवर्तन घडवूया…!
दिलीप ब्रह्मदेव माने
मा. आमदार, दक्षिण सोलापूर