आडम मास्तरांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र ; म्हणाले भाजपशी खरी लढाई…

आडम मास्तरांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र ; म्हणाले भाजपशी खरी लढाई…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन 

सोलापूर, दि.२८ ऑक्टोंबर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून माकप पक्षाच्या वतीने माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सकाळी आकरा वाजता आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत अनिल वासम, एम.एच.शेख आदींची उपस्थिती होती.

 

यावेळी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून माझा अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी महाविकास आघाडीकडून माझी अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त करताना जरी काँग्रेसला उमेदवारी मिळाली तर या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असेही ते म्हणाले.

दरम्यान माझा प्रमुख विरोधक हा भाजप असून एमआयएम या पक्षाला मी जुमानत नाही, भाजपचा उमेदवार जरी पद्मशाली असला तरी मी स्वतः पद्मशाली समाजाचा आहे हजारो कार्यकर्ते आहेत, समाजाच्या लोकांसाठी मी अनेक वर्षे कामे केले आहेत त्यामुळे त्याचा काही फरक पडणार नाही असेही मास्तर म्हणाले.यावेळी एम एच शेख, अनिल वासम, व्यंकटेश कोंगारी, बापू साबळे, सनी शेट्टी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *