माजी आमदार आडम मास्तर यांनी आघाडीतील नेत्यांची भेट : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांशी झाली चर्चा

– आडम मास्तर यांना निवडून आणू ; शरद पवारांच्या नेत्यांनी बांधली विधानसभेची मोट 

– आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयास आडम मास्तर यांची भेट

– माजी नगरसेवक तौफिक शेख , प्रमोद गायकवाड यांचा शहर मध्य मतदार संघावर दावा…..

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि. १४:- आगामी विधानसभा निवडणूक दृष्टीक्षेपात आली आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. शहर मध्य विधानसभा मतदार संघावरून आघाडीत माकप या जागेसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. तशी तयारी माकपने सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने माजी आमदार आडम मास्तर यांनी आघाडीतील नेत्यांची भेट घेणे सुरू केले आहे. रविवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर मनोहर सपाटे , माजी महापौर महेश कोठे , माजी नगरसेवक तोफिक शेख , प्रमोद गायकवाड आदींची उपस्थिती होती. झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक तौफिक शेख आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी देखील शहर मध्य मतदार संघावर दावा करत आम्ही देखील या जागेसाठी आग्रही असल्याचे सांगितले. बैठक संपन्न झाल्यानंतर सर्व नेत्यांनी कार्यालयासमोर अनौपचारिक हितगुजत करत एकमेकांच्या हातात हात देत आभार मानले.

         भारतात लोकशाही आणि समाजवादाची मुल्ये जोपासणाऱ्या डाव्या पक्षांचे नेहमीच जनतेच्या हिताकरिता आग्रही राहिलेले आहे. सध्या राज्यात लोकशाही अधिष्ठित महाविकास आघाडीच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभा जागेसह राज्यातील १२ जागांबाबत माकपाचे नेतृत्वाने १५ जून २०२४ रोजी शरदचंद्र पवार यांना भेटून महाविकास आघाडीबाबत सकारात्मक चर्चा केलेली आहे. त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी याबाबत सकारात्मक सल्लामसलत होऊन निर्णय घेण्याचे आश्वसन दिले. त्यानुसार वरिष्ठांचा निर्णय येताच सोलापूर शहर मध्य विधान सभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करून कॉ. नरसय्या आडम मास्तर यांना मताधिक्याने निवडून आणू असे कॉ. आडम मास्तर यांच्या सदिच्छा भेटीत राष्ट्रीवादी कॉंग्रेस शरद पवार गट यांचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सांगितले.

माझ्यासाठी एवढं करा असे खरटमल यांच्या खांद्यावर हात ठेवून आडम मास्तर म्हणत तर नसतील ना ?

 

                दरम्यान रविवार दि. १४ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांना सोलापूर शहरमध्य विधानसभा मतदार संघाची जागा माकपाला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली.  यावेळी याशिष्टमंडळात कॉ. नलिनी कलबुर्गी, कॉ. युसुफ शेख (मेजर), अकिल शेख, रवी गेंटयाल, असिफ पठाण, शाम आडम आदींची उपस्थिती होती.

महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीचे कामकाज केले जाणार आहे. त्यानुसार वरिष्ठांचा निर्णय येताच सोलापूर शहर मध्य विधान सभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करून कॉ. नरसय्या आडम मास्तर यांना मताधिक्याने निवडून आणू.

सुधीर खरटमल , अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट 

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साधक-बाधक चर्चा झाली. सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी आमची आग्रही भूमिका आहे त्यासाठी सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे आणि यापुढे घेत राहू शेवटीं त्या त्या पक्षातीलवरिष्ठ नेत्यांचा निर्णय असणार आहे.

अडम मास्तर , माजी आमदार माकप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *