प्रभाग क्रमांक २६ मधील हेरिटेज फॉम येथे नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप व बक्षीस वितरण
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर / प्रतिनिधी
जुळे सोलापूरातील प्रभाग क्रमांक २६ मधील हेरिटेज फार्म येथे सालाबादप्रमाणे हेरिटेजचा राजा गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. अनंत चतुर्थी निमित्त महाप्रसाद वाटप व स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. त्याचे बक्षीस वितरण समारंभ प्रभाग क्रमांक २६ च्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. हेरिटेज भजनी मंडळ यांनी उत्कृष्ट भक्ती गीते सादर करण्यात आल्याने त्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

हेरिटेज फॉर्मचे चेअरमन सुजित कोरे यांनी सदर नगरातील पाण्याची पाईपलाईन,अंतर्गत दिवाबत्ती व रस्त्याच्या बाबतीत समस्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सांगितल्या, राजश्री चव्हाण यांनी त्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. प्रारंभी राजश्री चव्हाण व भाजपचे सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी चेअरमन सुजित कोरे, महारुद्र खुरपे, ब्रह्मदेव थिटे,रवी कोटगी,विशाल खाडे,अमोल गोतसुर्वे,सागर माळी,राम सुरवसे, सोमनाथ स्वामी,विठ्ठल लहाने,वैभव ठोकळ,किरण क्षीरसागर,गजानन साठे,आशिष बिराजदार,विजय म्हमाणे,सूर्यकांत चौधरी,रवी मस्के तसेच शुक्ला साठे,सुचिता थिटे,अर्चना खुरपे,अंजली क्षीरसागर,मनीषा बिराजदार,ज्योती माळी,विजयश्री माशाळ, भाग्यश्री चौधरी,विद्या लहाने,रूपाली शिंदे आदींसह नागरिक उपस्थित होते.