पिण्याच्या पाईपलाईन कामामुळे प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल – किसन जाधव

प्रभाग क्रमांक २२ येथे पिण्याच्या पाईपलाईन कामाचे उद्घाटन…

पिण्याच्या पाईपलाईन कामामुळे प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल – किसन जाधव

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२५ मे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या प्रयत्नातून स्थानिक स्वराज्य संस्था परिषदेतील विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरविणे सन २०२३-२४ या अंतर्गत १८ लाख ९५ हजार १२६ रुपये खर्चित नवीन पिण्याचे पाईपलाईन कामाचे उद्घाटन करण्यात आले.

           दरम्यान, प्रभाग २२ मधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांचे खूप मोठे योगदान आहे. प्रभागातील प्रत्येक परिसर हा मूलभूत सुविधा पासून वंचित राहू नये यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो या पुढील काळात देखील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देखील यावेळी किसन जाधव यांनी दिली.

               याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, अमोल लकडे, अमोल जगताप, माऊली जरग, शिवाजी कांबळे,दत्ता जाधव,दिलीप चव्हाण, तुकाराम पाटणकर,उमेश जाधव, महालिंग जाधव, दीपक केकडे, बजरंग गिरकर,राम चव्हाण, प्रकाश केकडे, मारुती कांबळे, पांडुरंग कांबळे, जाधव मामा,कुमार केकडे, उमा मावशी लकडे, शारदा जगताप, सुरेखा डांगे पाटणकर आदींसह प्रभागातील नागरिकांच्या उपस्थित या नवीन पाईपलाईन कामाचे उद्घाटन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *