माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप…..
राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य…!
सोलापूर व्हिजन
दि. २२ जुलै – मुमताज नगर येथील बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेत पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे यांच्या वतीने माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक समाजसेवक अनिल भि.चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप महिला आघाडी सरचिटणीस गीताताई पाटोळे यांना सन्मानित करण्यात आले होते.
सदर शाळेमध्ये मूकबधिर विद्यार्थी यांनी त्यांनी केलेले अभ्यासक्रम उपस्थितीना दाखवले असता एखाद्या चांगल्या विद्यार्थ्यांनाही लाजवेल असा अभ्यासक्रम केलेला होता त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे माजी नगरसेविका राजश्री चव्हाण व सर्व मान्यवर यांनी कौतुक केले.प्रत्येक विद्यार्थ्याने आपला व्यवस्थितपणे परिचय करून दिला.
त्यानंतर शाळेच्या वतीने नगरसेविका राजश्री चव्हाण यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अध्यक्षस्थानी लाभलेले भाजपचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल भिमराव चव्हाण यांचा व भाजपा शहर महिला आघाडी सरचिटणीस गीता पाटोळे यांचाही सत्कार करण्यात आला.
नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सदर मूक बहिर शाळा संस्थापक यांनी चांगल्या प्रकारे मूकबधिर विद्यार्थ्यांची जोपासना केलेली असून त्यांना योग्य प्रकारे अभ्यासक्रम घेतला आहे. मूकबधिर विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास एखाद्या चांगल्या विद्यार्थ्यांनाही लाजवेल असे सुंदर अक्षर,एक ते शंभर पर्यंत लिहिलेले पाढे, गणित विषयातील वजा-बाकी व्यवस्थित पणे सोडवलेले होते त्याबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
भविष्यात शासनाकडून सदर शाळेसाठी सर्व सोयी सुविधांसाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार ,यांच्याकडे पाठपुरावा करून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले. यावेळी संस्था सदस्य श्रीनिवास इटकर,मुख्याध्यापक शाम वाघमारे ,अरविंद कुलकर्णी, अजित पवार , साळुंखे तसेच मूकबधिर यांचे आई वडील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.