कस्तुरे असोसिएट्स सॅमसंग ठरले सर्वोत्कृष्ट स्टॉल पारितोषिकाचे मानकरी  इलेक्ट्रोची झाली थाटात सांगता

इलेक्ट्रो २०२५ ची थाटात सांगता ;

कस्तुरे असोसिएट्स सॅमसंग ठरले सर्वोत्कृष्ट स्टॉल पारितोषिकाचे मानकरी…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१९ फेब्रुवारी

 सोलापूर शहरातील होम मैदानावर १२ ते १८ फेब्रुवारी पर्यंत सुरू असलेल्या इलेक्ट्रो  या भव्य प्रदर्शनाचा सांगता समारंभ बँक ऑफ महाराष्ट्राचे असिस्टंट जनरल मॅनेजर संजीव कुमार  व सोलापूर एअरपोर्टचे व्यवस्थापक चंद्रेश वंजारा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी इलेक्ट्रो २०२५ चे सर्वोत्कृष्ट  स्टॉलचे बक्षिस कस्तुरे असोसिएट्स -सॅमसंग चे   मंगेश कस्तुरे यांना प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी मंचावर सेडाचे अध्यक्ष आनंद  येमुल , चेअरमन दीपक मुनोत ,  उपाध्यक्ष  डॉ. सुरजरतन धुत, सचिव भूषण भुतडा  , खजिनदार सुयोग कालाणी,  सह सचिव हरीश कुकरेजा  उपस्थित होते.

                प्रारंभी सोलापूर  इलेकट्रोनिक्स डिलर्स असो. चे सचिव भूषण भुतडा यांनी सर्वांचे स्वागत केले. अध्यक्ष आनंद येमूल यांनी प्रास्ताविक करताना सर्व संचालक मंडळ व इलेकट्रो समितीचे सभासदांनी घेतलेल्या परिश्रमाबद्धल आभार व्यक्त केले. इलेक्ट्रो चे चेअरमन दीपक मुनोत  आपल्या भाषणात नागरिकांनी या प्रदर्शनास दिलेल्या उत्स्फूर्त  प्रतिसाद तसेच  मुख्य प्रायोजक प्रायोजक  शार्प , सह प्रायोजक  हायफा इलेकट्रीकल्स व एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी  यांचे विशेष आभार व्यक्त केले. समस्त स्टॅालधारक, विद्यार्थी व सहभागी कंपन्यांचेही विशेष आभार मानले. सात दिवसांत सुमारे एक लाख लोकांनी  यंदा प्रदर्शनास भेट दिल्याचे त्यांनी आवूर्जन उल्लेख केला.

श्री संजीव कुमार यांनी हे प्रदर्शन अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे सांगत सेडाचे सर्व पदाधिकार्यांच्या एकात्मतेचे कौतुक  केले. मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरातील प्रदर्शना बरोबरीचे हे प्रदर्शन होते . असल्याचे त्यांनी विशेष कौतुक  केले. श्री चंद्रेश वंजारा यांनी सुद्धा या उपक्रमबद्दल संपूर्ण सेडा टीमचे अभिनंदन केले .

        याप्रसंगी इलेक्ट्रो २०२५ साठी संयोजन  करणाऱ्या आर्कि . नीरज मेहता ,  भिंगारे मंडपचे श्री. सुधीर भिंगारे, जव्हेरी अ‍ॅडव्हर्टायझिंग चे श्री. संदीप जव्हेरी,  श्री सिद्धनाथ  पाटोळे, आनंद कोंगे, राजेश दैवज्ञ आदींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध गटातील पारितोषिक  ईश्वर मालू , खुशाल देढिया यांनी जाहीर केले.

इलेक्ट्रॉनिकस व होम अप्लायन्सेस (कंपनी फीटेड विभाग)  

प्रथम-  बदामीकर अँड सन्स (हायर)  ; द्वितीय – राठी डिस्ट्रिब्युटर्स (बॉश )

इलेक्ट्रॉनिकस व होम अप्लायन्सेस (सेल्फ फिटेड विभाग):

प्रथम- महेंद्र इलेक्ट्रॉनिक्स ; व्दितीय – किचन किंग

इलेक्ट्रॉनिकस व होम  अप्लायन्सेस (कंपनी टाईप सेल्फ फिटेड विभाग):

प्रथम- सुयश एंटरप्रायझेस ; व्दितीय – पवन ट्रेडर्स

इलेक्ट्रॉनिकस  विभाग (कंपनी फिटेड  विभाग) :

प्रथम- सुयोग डिजीटल (सोनी)

इलेक्ट्रॉनिक्स विभाग (सेल्फ फिटेड  विभाग) :

प्रथम- विजय इलेक्ट्रॉनिक्स (अकाई )

इलेक्ट्रोनिक्स् विभाग (कंपनी टाईप सेल्फ फिटेड  विभाग) :

प्रथम- एकबोटे ब्रदर्स

होम अप्लायन्सेस  (कंपनी फिटेड  विभाग):

प्रथम- चव्हाण सेल्स (आयएफबी) ; व्दितीय – ओपल कॉम्पुटर्स  (कॅरियर ए सी )

होम अप्लायन्सेस  (सेल्फ फिटेड  विभाग):

प्रथम- सर्वोदय ट्रेडर्स (बॉस ) ; व्दितीय – आनंद ट्रेडिंग ोम  अप्लायन्सेस (कंपनी टाईप  सेल्फ फिटेड  विभाग):

प्रथम- मोनिका इलेक्ट्रॉनिक्स ;  व्दितीय – बालाजी आटा चक्की

आय. टी. व  कॉम्पुटर्स   विभाग : (कंपनी फिटेड विभाग):

प्रथम-  दर्शन इलेक्ट्रॉनिक्स

आय. टी. व  कॉम्पुटर्स   विभाग : (सेल्फ फिटेड  विभाग):

प्रथम – प्राईम डिजिटल फोकस

सोलर  सिस्टम्स  (कंपनी विभाग) :

प्रथम- चैतन्य आदित्य सोलर शॉपी

सोलर  सिस्टम्स  (सेल्फ फिटेड ) :

प्रथम- एलग्रीस सोलर

फिटनेस  (कंपनी फिटेड )

प्रथम – फिटनेस मॉल

फिटनेस  (सेल्फ फिटेड )

प्रथम – गौरव एजेन्सीस

वॉटर  प्युरिायर : (कंपनी फिटेड)

प्रथम – सर्वोदय ट्रेडर्स (हॅवेल्स)

वॉटर  प्युरिफायर : (सेल्फ फिटेड विभाग):

प्रथम – दोशीबा वॉटर ट्रीटमेंट

फूड स्टॉल

जगदंबा केटरर्स , लाईम ट्विस्ट कॅफे या स्टॉलचे परिक्षण   प्रा. आरती माने, आर्की. रोहन राठी व लक्ष्मीकांत सोमाणी यांनी केले. प्रा. आरती माने यांनी परिक्षणविषयी आपले मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी परिक्षकांचा सत्कार करण्यात आला.  शेवटी दि.१८ रोजीचे भाग्यवंत क्रमांक काढण्यात आले.  सर्वांचे आकर्षक़ ठरलेल्या सात  दिवसाचा एकत्रित्त बंपर लकी ड्रॉ ५५५४४ तिकट क्रमाकांस  बक्षिस जाहीर करण्यात आला. ह्या भगवंतास आयएफबीची ५१,९९० किमतीची  किचन चिमणी भेट मिळणार आहे. शेवटच्या दिवशीचे  काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ चे भाग्यंत क्रमांक –  ७२९१९, ७४०८५ व ७४०६२ आहेत.  विजेत्यांनी सेडा कार्यालय, सुराणा मार्केट येथे स.10 ते 12 यावेळेत 15 दिवसांत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.  खजिनदार सुयोग कालाणी यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  सौ. आरती अग्निहोत्री यांनी केले.

या कार्यक़्रमास संचालक  संदेश कोठारी, यल्लप्पा भोसले ,बसवराज नवले, चंद्रकांत शहापुरे ,राजेश जाजू, रविंद्र पाचलग, गणेश सुत्रावे,  तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष केतन शाह, सतीश मालू, शिवप्रकाश चव्हाण, समीर गांधी, विपीन कुलकर्णी , कौशिक  शाह, खुशाल देढिया, ईश्वर मालू सह सूर्यकांत कुलकर्णी, विजय टेके ,विश्वजीत कुलकर्णी, सचिन करवा, सतिश मुंदडा,   दत्तात्रय अंबुरे, जॉय  छाब्रिया,  सुनिल भांजे,  घनश्याम चव्हाण , रवींद्र कोळी, अंगद चव्हाण ,गणेश दरक, संतोष बुरबुरे, सौरभ राजमाने,राजेंद्र बिराजदार ,ईरफान शेख आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *