इलेक्ट्रो प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद ; प्रदर्शनास केंद्रीय मदत देण्याकरिता प्रस्ताव पाठवणार खा. प्रणिती शिंदे यांचे आश्वासन
आज रविवारी सकाळी ११ पासून प्रदर्शन राहणार सुरू
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ फेब्रुवारी
गेल्या पंचवीस वर्षापासून सोलापूर शहरांमध्ये उत्तमरीत्या इलेक्ट्रो प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. याप्रदर्शनाकरिता केंद्राच्या माध्यमातून इतर प्रदर्शनाला जसा निधी दिला जातो. त्याच धर्तीवर इलेक्ट्रो प्रदर्शनाकरिताही मदत देण्याकरिता आपण प्रस्ताव पाठविणार असल्याचे मत खासदार प्रणती शिंदे यांनी व्यक्त केले. इलेक्ट्रो २०२५ होम मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला खासदार शिंदे यांनी भेट दिली. यावेळी केतन शहा यांनी केंद्रीय मदतीबाबत खासदार शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. यावेळी इलेक्ट्रोच्या मुख्य कार्यालयामध्ये खासदार शिंदे यांचा सत्कार सेडा चे अध्यक्ष आनंद येमूल यांच्या हस्ते करण्यात आले.
होम मैदानावर सुरु असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स, होम अॅप्लायन्सेस, कॉम्प्यूटर, टेलिकम्युनिकेशन, सोलार उत्पादन व फिटनेस इक्विपमेंटसचे प्रदर्शन इलेक्ट्रो २०२५ रविवारी सकाळी ११ ते रा. ९.३० पर्यंत असणार असून ग्राहकांनी याचा अधिकाधिक फायदा घ्यावा असे आवाहनअध्यक्ष श्री आनंद येमूल यांनी केले आहे. यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असूनहायफा इलेक्ट्रिकल्स् व एमआयटी विश्वशांती गुरुकुल हे सह प्रायोजक आहेत. इलेक्ट्रो २०२५ या प्रदर्शनाचे हे २५ वे वर्ष असून जर्मन हँगर पध्दतीचे डोम सोलापूरकरांचे आकर्षण ठरले आहे. अशाप्रकारचे नियोजन व व्यवस्थापनासाठी सेडाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ३०० स्टॉलधारकांचा समावेश असलेल्या या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे विविध भेट वस्तु देण्यात येत असून शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ द्वारे सुमारे एकावन्न हजार किंमतीचे आयएफबी कंपनीचे किचन चिमणी भेट देण्यात येणार असल्याची माहिती सचिव भुषण भुतडा यांनी दिली. पाच दिवसांत सुमारे साठ हजार लोकांनी भेट दिली असल्याचे सांगण्यात आले. सेल्फी पॉईंट वर अनेक जण आपले छायाचित्र काढताना दिसत आहे. याचे संपूर्ण निटनेटके नियोजन सेडा समिती द्वारा करण्यात येत आहे.
याप्रसंगी इलेकट्रो चेअरमन दीपक मुनोत, सचिव भूषण भुतडा, खजिनदार सुयोग कालानी , सह सचिव हरीष कुकरेजा, उपाध्यक्ष डाॅ.सूरजरतन धुत व संचालक सर्वश्री यल्लप्पा भाेसले, चंद्रकांत शाहपुरे, बसवराज नवले , रवींद्र पाचलगे व संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, शिवप्रकाश चव्हाण, खुशाल देढीया, ईश्वर मालू , केतन शाह, बिपीन कुलकर्णी आदी उपस्थित होते. खासदार शिंदे यांनी विविध स्टॉलला भेटी देऊन इलेक्ट्रो प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत मनोज येलगुलवार, तिरुपती परकीपंडला, यांच्यासह सेडाचे सर्व सदस्य उपस्थित होते.