मतदार यादीत घोळ मुस्लिम घरात हिंदूंची नावे ; मतदार यादी घेऊन कार्यकर्ते ऑन द स्पॉट

मतदार यादीत घोळ मुस्लिम घरात हिंदूंची नावे ; मतदार यादी घेऊन कार्यकर्ते ऑन द स्पॉट

उमर शेख यांच्या घरात शिराळकर आले कोठून सर्वांना पडला प्रश्न 

निवडणूक प्राधिकरणास तक्रार देणार 

प्रभाग १५ मधील विविध नगरात मतदार यादी घेऊन कार्यकर्ते मतदारांची ओळख पटवताना..
उमर शेख यांच्या याच घरात हिंदूंची नावे आल्याने सर्वचजण चक्रावले..

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२४ नोव्हेंबर 

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका प्रशासनाने मतदार यादी जाहीर केली. परंतु त्या यादीत मतदारांचा घोळ झाल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते ऑक्टिव्ह मोडवर आले आहेत. मतदार यादी घेऊन कार्यकर्ते ऑन द स्पॉट मतदारांच्या घरी दाखल झाले आहेत. निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या मतदार यादीत घोळ झाला असून मुस्लिम घरात हिंदूंची नावे तपासणीत आढळून आली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या प्राधिकरणावर संशयाची सुई आली आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक १५ मध्ये मतदारांच्या संख्येत विसंगती आढळली आहे. एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने मतदार यादीवर मतदारांचा विश्वास ढासळतो आहे. एका मुस्लिम घरात हिंदूंची नावे कशी काय येऊ शकतात? असा सवाल आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. असे अनेक प्रकरणे आता उजेडात येत आहेत. यामुळेच बोगस मतदानाचे प्रमाण वाढत चालले आहे.असा आरोप आता करण्यात येत आहे.

 

तर दुसरीकडे मृत मतदारांची नावे मतदार यादीत कायम आहेत. तर जिवंत असलेले मतदार मृत दाखवल्याने मतदार यादीवर आक्षेप घेतला आहे आहे. एवढा मोठा घोळ मतदार यादीत कसा काय होऊ शकतो. असा प्रश्न मतदारांना सतावत आहे. यामुळे बोगस मतदानाचे प्रमाण वाढून निकालाचे चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात स्टॅन्डिंग माजी नगरसेवक, इच्छुक आणि त्यांचे कार्यकर्ते सतर्क होऊन स्वतः घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेत आहेत.

निवडणूक प्राधिकरणास तक्रार देणार 

गेल्या अनेक वर्षांपासून मतदार यादीवर काम करत आहे. अशा अचानक पद्धतीने नाव यादीतून गायब होत आहेत. मुस्लिम घरात हिंदूंची नावे आहेत. मृत व्यक्ती आणि जिवंत व्यक्तींच्या नावाचा घोळ आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदारांची ओळख पटवली जात आहे. सोमवारी यावर कायदेशीरा मार्गाने हरकत घेतली जाणार आहे.

श्रीकांत गायकवाड, कार्यकर्ते 

मतदार यादीत घोळ

आमच्या कॉलनीत राहणाऱ्या व्यक्तींची नावे एका मतदार यादीत नावे असताना आमची नावे दुसऱ्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यावर माझा फोटो नसून दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो आहे. माझ्या पत्नीचे नाव फोटो आहे. परंतु माझे नाही.असा यादीचा घोळ दिसून येत आहे.

– नाथा यमगर, मतदार 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *