या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, वेळापत्रक बघा अन् लागा तयारीला…

बघा या तारखेला नगरपालिकेची झुंज!

स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, वेळापत्रक बघा अन् लागा तयारीला…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.४ नोव्हेंबर

राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका राज्यासाठी एक उत्सव ठरणार आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

 

कशा होतील निवडणुका?

चार वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा, टप्पे आणि इतर तपशील जाहीर करण्यात आले. निवडणुका ईव्हीएमद्वारे होतील. ओबीसी आरक्षण आणि मतदारयादी सुधारणांवरही स्पष्टता येईल. राज्यातील राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून, स्थानिक मुद्द्यांवरून जोरदार सामना रंगणार आहे.

कधी होतील निवडणुका? तारीख काय?

२४६ नगरपालिका आणि ४२ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मतदारसंघनिहाय ७ नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मोबाईल अॅपमधून आपले नाव तपासू शकता. मतदारांना उमेदवारांची माहिती देखील मिळणार आहे.

दुबार मतदार संदर्भात आयोगाने दक्षता घेतली आहे. दुबार मतदाराच्या नावापुढे स्टार असणार आहे. अधिकारी त्यांची चौकशी करतील. अन्यत्र मतदान करणार नाही, याची हमी घेतली जाईल, असे आयोगाने सांगितले. दुबार मतदारांची वेगळी यादी असणार आहे.

 

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

 

अर्ज दाखल करण्याची तारीख १० नोव्हेंबर २०२५

 

अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख १७ नोव्हेंबर २०२५

 

नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबरला होईल.

 

अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर आहे.

 

उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबरला जाहीर होईल.

 

मतदान २ डिसेंबर रोजी होईल

 

तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होऊन निकालही त्याच दिवशी जाहीर होईल.

 

यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. या निवडणुकीत १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदान करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *