आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार !
मुख्य निवडणूक आयोग आज जाहीर करणार निवडणूक कार्यक्रम…!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. १५ ऑक्टोंबर – महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजता मुख्य निवडणूक आयोग दिल्ली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक कार्यक्रम सविस्तरपणे जाहीर करण्यात येईल.
दरम्यान गेल्या आठवड्याभरापासून आगामी विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिते बाबत सर्वत्र चर्चा सुरू होती. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजता आयोगाचे सहसंचालक अनुज चंडक याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. सदरची पत्रकार परिषद संपन्न झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू होईल असे देखील सांगण्यात येत आहे.