बालसंगोपनासाठी अंगणवाडीचा “आरंभ” उपक्रम…
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केले कृतिशील नवोपक्रम !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ फेब्रुवारी
सोलापूर शहर बालविकास प्रकल्प अधिकारी शहर पश्चिम विजापूर रोड बिटच्या वतीने आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन म्हेत्रे वस्ती येथील ओंकार प्रशाला येथे करण्यात आले होते. या पालक मेळाव्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशांत शिर्के, बाल विकास प्रकल्प अधिकारी शहर पश्चिम विजापूर बिट दीपक ढेपे, ओंकार शाळेचे मुख्याध्यापक हरीहरदास गुरव,मुख्यसेविका रोहिणी निर्मळे, कुलकर्णी, ढेपे आदींची उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फित कापून तसेच प्रतिमा पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

तदनंतर प्रमुख मान्यवर बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रशांत शिर्के आणि दीपक ढेपे यांनी उपस्थित माता-पालकांना व बालकांना मार्गदर्शन करताना बालकांचा आहार तसेच त्यांचे संगोपन कसे असावे, याबद्दल माहिती दिली. या मेळाव्यातून बालसंगोपनासाठी कशा पद्धतीने कृतीशील उपक्रम राबवायचे याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली, असून याचा पालकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
दरम्यान, राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत सोलापूर शहर पश्चिम विजापूर रोड नागरी प्रकल्पातील एकुण २८ अंगणवाड्यांनी मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या मेळाव्यात विविध अंगणवाड्यांनी एकाच छताखाली २९ स्टाॅल उभारले होते. या विविध स्टॉल्समध्ये अंगणवाडी मध्ये येणाऱ्या बालक व त्यांच्या पालकांना “बालसंगोपनासाठी कुटुंबाचे आणि आणि समुदायाचे सक्षमीकरण ” या आरंभ पालक मेळावा उपक्रमांतर्गत समजावून सांगण्यात आले. सदरच्या उपक्रमामध्ये खेळ व संवाद कृतीसुची अंगणवाडी सेविकांनी बालकांच्या निगा राखणा-या व्यक्ती यांच्यासाठी बनवलेली आहे. खेळ व संवाद कृतीशील माध्यमातून बालकांचा वयोगटानुसार सर्वांगीण विकास साधायचा याबद्दल मेळाव्यात स्टाॅलचे माध्यमातुन पालकांना माहिती देण्यात आली.
तत्पूर्वी आपल्या प्रास्ताविकेत मुख्य सेविका रोहिणी निर्मळे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शनपर भाषण करताना आयुष्यातील जडणघडण कालावधीचा विशेष टप्पा महत्त्वपुर्ण आहे.बालकांचे मेंदुचा विकास योग्य पध्दतीने कसा होवु शकतो. यासाठीच आज पालक मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमाचे तर सूत्रसंचालन ओकांर प्रशालेतील शिक्षिका सुकेशनी गायकवाड यांनी केले. तर पुजा गुरव यांनी सर्व मान्यवरांचे उपस्थितीत पालकांचे यांचे आभार मानले.
या मेळाव्यास लाभार्थीपालक, विद्यार्थी उपस्थित होते. पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका भारती गुरव, प्रमिला शिंगे, जयश्री कुलकर्णी, ललिता शिंदे, ओकांर प्रशालेतील सर्व सहशिक्षक यांनी व बिट मधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी परिश्रम घेतले.
स्टॉलच्या माध्यमातून कृतिशील आरंभ उपक्रम
सदरच्या आरंभ उपक्रमांतर्गत बालसंगोपनाचे विविध धडे स्टॉलच्या माध्यमातून देण्यात आले. यामध्ये भविष्याचे झाड,मेंदूचे जाळे, झुंबर व खुळखुळा,कागदांचा पाऊस, आरसा, हस्तकौशल्याच्या आधारित मास्क टोप्या,चष्मे घरगुती पुठ्ठ्यावर बनवलेले साहित्य,घरगुती वाद्य वाजविणे,कापडी चिंध्या व पातळ कणिक आहार प्रात्यक्षिक, मायेचा घ्यास,सुरक्षित वातावरण,भरणीत बाॅल टाकणे काढणेओढणारी खेळणी,बोगदा,खेळघर, मुक्त खेळ किराणा दुकान दागिनेच दुकान,शेती ठसेकाम, आकार बालशिक्षण, आदींसह आकार पालक ग्रुप स्टाॅल गप्पा गाणी गोष्टी,लसीकरण तळ्यात मळ्यात खेळ, खेळ संपवूया आहाराचे लाॅकडाऊन, खेळ आहार व आरोग्याची सापशिडी,असे विविध स्टाॅलची वैविध्यपूर्ण मांडणी बिटमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी यावेळी केली होती. स्टॉल्स पाहण्यासाठी आलेल्या पालकांना बालकांचा विकास करण्यास घरगुती साहित्यामधुन बालकांशी खेळ व संवाद करुन आपण सर्वांगीण विकास कसा करु शकतो याचे महत्त्व प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करुन दाखवले.