डॉ. किरण देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा …. ११४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

डॉ. किरण देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१८ मे 

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक भारतीय जनता युवा  मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ.किरण देशमुख यांच्यावाढदिवसानिमित्त शहर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. नवी पेठ येथील संपर्क कार्यालयात सामाजिक, राजकीय, धार्मिक, उद्योग क्षेत्रातील आणि सर्वपक्षीय नेते हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत उपस्थिती लावली.

       दरम्यान, डॉक्टर किरण देशमुख युथ फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. याशिबिरात ११४ जणांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. बसवेश्वर रक्तपेढीचे सहाय्य या रक्तदान शिबिराला लाभले.यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी सभागृह नेते संजय कोळी, शिवानंद पाटील, नागेश भोगडे, नारायण बनसोडे, अविनाश पाटील, बाबुराव जमादार, राजकुमार पाटील,ज्ञानेश्वर कारभारी, संजय खडके, राजकुमार काकडे, बाजार समिती संचालक वैभव बरबडे,उद्योजक लक्ष्मीकांत चाटला, गौरीशंकर वाले, दयानंद विजापुरे शिवशंकर चोळे, जीएम ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, डिके ग्रुपचे संस्थापक दशरथ कसबे, पिंटू डावरे, मंडल अध्यक्ष देविदास बनसोडे, दत्तात्रय, प्रवीण वाले, पंकज काटकर, रवी कोटमळे, शिवानंद पुजारी, आनंद बिरू, श्रीनिवास पुरुड, बाळासाहेब आळसुंदे, शेखर फंड,शंकर शिंदे, सिद्धार्थ सालक्की ,प्रवीण कांबळे, राहुल घोडके, राजाभाऊ आलुरे, रुचिरा मासम, वीरेश उंबरजे, गणेश भोसले, महालिंगप्पा परमशेट्टी, श्रीशैल अंबारे, प्रकाश हत्ती, पिनू करपे, सुधाकर नराळ,प्रवीण दर्गोपाटील, प्रशांत फत्तेपूरकर, सुभाष पवार,सुजित चौगुले, हरिप्रसाद बंडेवार, मनोज मलकूनाईक, सुमित बिराजदार यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *