डाॅ.संपत बलदवा यांना जीवनगाैरव पुरस्कार प्रदान
सोलापूर व्हिजन न्युज,
साेलापूर, दि.१४ फेब्रुवारी
साेलापूर ऑबस्टेट्रिक्स अँड गायनॅकाॅलाॅजिकल साेसायटी (ओ.बी.जी. वाय) द्वारे ज्येष्ठ स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. संपत बलदवा यांना ‘जीवनगाैरव पुरस्कार’ देऊन त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गाैरव केला आहे.

इंडियन मेडीकल असाेसिएशनच्या हाॅलमध्ये सदर पुरस्कार साेहळा उत्साहात पार पडला. गेल्या पाच दशकांपासून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले याेगदान, विशेषतः स्त्रीराेग आणि प्रसूतीशास्त्र क्षेत्रातील त्यांची निस्वार्थ सेवा आणि चिकाटी अतुलनीय आहे. हा पुरस्कार त्यांच्या वचनबद्धतेचा आणि सातत्याचा सन्मान असून, ताे तरुण डाॅक्टरांसाठी एक प्रेरणास्त्राेत ठरेल. साेलापूरच्या आराेग्य क्षेत्रात डाॅ. बलदवा यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते आणि या पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला आहे.
साेलापूरमधील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय आणि बलदवा हाॅस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी हजाराे रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. यावेळी डाॅ. सुजाता कुलकर्णी, डाॅ. लता पाटील, डाॅ. सुधांशु चितळे, डाॅ. किरण चितळे, डाॅ. सुहासिनी शहा, डाॅ. राेहिणी देशपांडे, डाॅ. अंजली चिटणीस, डाॅ. दाेशी,
डाॅ. कुलकर्णी, डाॅ. दाेड्डामणी आदी उपस्थित हाेते.