शहरात भीम जयंतीचा उत्साह ; बॉबी ग्रुपच्या देखाव्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२० एप्रिल
महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता भव्य दिव्य अशा मिरवणुकीने होत आहे. कालपासूनच सोलापूर शहरात भीम जयंतीचा उत्साह जल्लोष दिसून येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या निवडणुकीचे सोलापूर नव्हे तर संपूर्ण राज्यभरात नावलौकिक आहे. मिरवणूक अनुभवण्यासाठी याची देही याची डोळा पाहण्यासाठी मुंबई पुणे नागपूर विदर्भातील असंख्य भीमसैनिक सोलापुरात दाखल होतात.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शहरातील प्रसिद्ध अशा बॉबी ग्रुपच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील डॉ.बाबासाहेब जयंती उत्सवानिमित्त आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता. माता रमाई आणि बाबासाहेब यांची प्रतिकृती विराजमान करण्यात आली होती. त्यावर भगवान गौतम बुद्धाची मूर्ती लक्ष वेधून घेत होती संपूर्ण पृथ्वीवर बाबासाहेबांच्या संविधानाचे वर्चस्व या देखाव्यातून दिसून आले. या देखाव्याच व मिरवणुकीचे उद्घाटन माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, बॉबी ग्रुप संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड, माजी नगरसेविका वंदना गायकवाड तसेच बॉबी ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बुद्ध वंदना करण्यात येऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांचा निळी टोपी व शेला देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मान्यवर विजयकुमार देशमुख यांनी तमाम भीमसैनिकांना जयंती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसंगी महामानवास अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांचा जनसागर उसळला होता.