डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मध्यवर्ती उत्सव समितीची महापालिका आयुक्त समवेत बैठक संपन्न…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.८ एप्रिल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कॉन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यलयात बैठक आयोजित करण्यात आले होते. यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे,अतिरिक्त आयुक्त रवि पवार,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त किरणकुमार मोरे,
बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समितीचे राजा सरवदे, राजा इंगळे, सुबोध वाघमोडे, के डी कांबळे, अँड संजीव सदाफुले,अरूण भालेराव, अजित गायकवाड, पृथ्वीजित सरवदे,सुशील सरवदे, शिवम सोनकांबळे, नागेश रणखांबे. बापू सदाफुले,राजा कदम, प्रेमीला तपलवंडे प्रबूध्द दोड्यानूर,बापू शिवशरण आदी सह प्रमुख मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिनांक 13 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा सप्ताह साजरा केला जातो, या दरम्यान शहरातील पाणीपुरवठा सुरळीत असावा सार्वजनिक ठिकाणी असलेले लाइट्स चालू ठेवावेत आणि 20 एप्रिल रोजी निघणाऱ्या सांगता मिरवणुकीच्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून घेणे, केबल वायर काढणे, निवडणूक मार्गावरील स्वच्छता ठेवणे. याशिवाय मिरवणुकीच्या मार्गावर पालिकेची एक रुग्णवाहिका आणि अग्निक्षमक दलाचे एक पथक तैनात करणे अशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समितीच्या विश्वस्ताने केली.सदरच्या मिरवणूकीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सव मंडळे सामील होणार आहेत. सदर मिरवणूकीमध्ये सामील होणाऱ्या नागरीकांनासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध सोय सुविधा करण्यात यावी अशी मागणी केली.
यावेळी महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे, आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लावणे,मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे, मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करणे इत्यादी सोय सुविधा महापालिकेच्या वतीने करण्यात येईल तसेच मिरवणूक मार्ग वरील कामे करण्या सदर्भात आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी अधिकारी याना सूचना दिल्या.