दिवाळीनिमित्त ४० गरजू कुटुंबांना फराळ व अभ्यंगस्नान साहित्य वाटप…

दिवाळीनिमित्त ४० गरजू कुटुंबांना फराळ व अभ्यंगस्नान साहित्य वाटप

बिनभिंतीच्या शाळेचा विधायक उपक्रम

 

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

पर्यावरणपूरक व सिंगल युज प्लास्टिकमुक्त दीपावली २०२५

संकल्प प्रदूषणमुक्त दीपावलीचा, निश्चय सिंगल युज प्लास्टिकमुक्त महाराष्ट्राचा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांनी वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषण करणारे फटाके लावू नका. अतिआवाजाच्या फटाक्यांनी बहिरेपणा येऊ शकतो.

शुभ दीपावली

 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२१ ऑक्टोबर 

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम सामाजिक संस्था संचलित बिनभिंतीच्या शाळेच्या वतीने गरजू,अनाथ,निराधार, वंचित, अपंग,४० कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळ व अभंगस्नान साहित्य वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने २०२० रोजी पासून हे कार्य चालू असून यंदाचे हे सहावे वर्ष आहे.यावेळी वंचित गरजु लोकांना दीपावली चिवडा, चकली, शंकरपाळी, रवा लाडू,बेसन लाडू, मोतीचूर्ण लाडू, बालुशाही, फरसाण इत्यादी फराळ पदार्थ तसेच साबण, तेल, उटणे, हे अभंग स्नानाचे साहित्य देण्यात आले. लोकसहभागातून वर्गणी काढून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी बिनभिंतीच्या शाळेचे प्रमुख गणेश माने म्हणाले की, दिवाळी हा प्रकाशाचा सण. जेथे अंधार तेथे पणती लावण्याचा उत्सव.अर्थातच इतरांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना आनंदात सहभागी करून घेण्याचा हा संदेश.त्यालाच अभिप्रेत असा उपक्रम घेण्यात येऊन अतिशय समाधान व आनंद होत आहे. गोरगरीब, अपंग, अनाथ, निराधार,वंचित अपंग, निराश्रित कुटुंबातील लोकांची दिवाळी गोड व्हावी त्यांनाही आनंद घेता यावा म्हणून हा फराळ वाटपाचा कार्यक्रम लोकसहभागातून घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी ज्या दानशूर व्यक्तींनी बिनभिंतीच्या शाळेला मदत केली त्यांचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमासाठी सोलापूर शहर कैकाडी समाज सेवा मंडळाचे सदस्य पांडुरंग माने, वसीम शेख, अनिल कमले, प्रवीण जगताप, रवी कोळी, विकास शिंदे आदींची उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *